Thursday, September 22, 2022

नीट परीक्षेत यश संपादन करणारे पंकज पाटिल भारताचे आशास्थान : रविन्द्र जैन

 


देऊळगाव मही अर्बन कडून सन्मानित

देऊळगाव राजा : प्रतिनिधी

       विद्यार्थ्यांनी विद्यार्थी  दशेत आपलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला पाहिजे. शिक्षणाला प्रतिष्ठा म्हणून नव्हे तर आपली मजबुरी म्हणून बघितले पाहिजे. यश संपादन करायचे असेल तर आपले छंद बाजूला ठेवा आणि फक्त आपल्या उद्देशाकडे लक्ष ठेवून अभ्यास करा नियमितपणे जिद्द व चिकाटीने अभ्यास केला तर येणाऱ्या काळात पंकज पाटील सारखे विद्यार्थी आपल्या परिसरातून घडतील असे प्रतिपादन देऊळगाव मही अर्बनचे अध्यक्ष रवींद्र जैन यांनी पंकज पाटील यांच्या सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलेयावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे पंढरी नागरे, शंकर शिंगणे, डॉ. महेश दंदाले, प्रवीण कोटेचा, गजानन पाटील, मुशीरखान कोटकर, संतोष जाधव आदी मंडळी उपस्थितीत होते.

  यावेळीप्रवीण कोटेचा यांनी सांगितले की,पंकज पाटील ने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ७२० पैकी ६६० गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले परिश्रमांच्या बळावर यश खेचून आणले आणि डाॅक्टर होण्याच्या दिशेने प्रवास आरंभ केला आहे. आपल्या शाळेचे, आई-वडिलांचे तसेच गावाचे नाव मोठे करणार्‍या अशा मुलीच उद्याच्या नवभारताचे आशास्थान आहेत. यावेळी रिखबचंद  जैन, पवन जैन, अजय कोटेचा, सुरेश कोटेचा, संजय शिंगणे, शिवानंद मुंडे, बाबुराव शेगर, संजय हिवाळे, शिवशंकर पेटकर , रामकिसन म्हस्के प्रदीप हिवाले , संभाजी शिंगणे, अजित बेगानी, संदीप राऊत, वासुदेव शिंगणे, गणेश शिंगणे, सुनील मोरे, रमेश भोरजे, गजानन भालेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनील मतकर तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण खिल्लारे, अक्षय शिंगणे, अजय माटे, भगवान बोंबले, विनोद शिंगणे  आदी  सहकार्य केले.

No comments:

Post a Comment