डॉ. सुनील कायंदे यांचे आव्हान
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना जागृत करण्या साठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात येत्या ५ ऑक्टोबर रोजी सावरगाव जिल्हा बीड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित रहा असे आवाहन बुलढाणा जिल्हा दसरा मेळावा कृती समितीचे संयोजक डॉ. सुनील कायंदे यांनी केले आहे.
दसरा मेळावा कृती समितीचे संयोजक युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ सुनील कायंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सावरगाव दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी सदर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ कायंदे प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले ऊसतोड कामगार कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्यासाठी,अठरापगड जाती मध्ये स्वाभिमान जागृत करण्याच्या दृष्टीने लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांनी परमपूज्य भगवान बाबा यांनी सुरू केलेली दसरा मिळाव्याची परंपरा कायम राखली होती. सन २०१४ मुंडे साहेबांच्या अकाली निधना नंतर त्यांच्या कन्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.मध्यंतरी भगवानगडाचे मठाधिपती प.पू नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगडावर कुठलेही राजकीय व सामाजिक मिळावे होणार नाही अशी भूमिका घेतली.मात्र दसरा मेळावा ही स्वाभिमानी परंपरा खंडित होता कामा नये म्हणून समाजा च्या आग्रहास्तव दसरा मेळावा ही परंपरा कायम ठेवू अशी भूमिका पंकजाताईंनी घेतली यासाठी नामदेव शास्त्री महाराज यांच्या निर्णया चे सन्मान राखून पंकजाताई मुंडे यांनी भगवान बाबा यांचे जन्मगाव सावरगाव (जिल्हा बीड) येथे दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.मुंडे साहेबांच्या आठवणी जागृत करण्या साठी लोकनेते पंकजाताई मुंडे यांच्या हाके ला प्रतिसाद देऊन सावरगाव दसरा मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीचे संयोजक सुनील कायंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.



No comments:
Post a Comment