शहरातील अनेक गणपती मंडळांना भेट
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
येथील मानाचा गणपती म्हणून श्री मयुरेश्वर सावजी गणेश मंडळ सुमारे अडीचशे वषार्ची ऐतिहासिक परंपरा जोपासत आहे. श्री मयुरेश्वर गणपती हा नवसाला पावणारा म्हणून भाविक भक्ता मध्ये मानल्या जातो मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा या भागातील आमदार डॉॅ राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच शहरातील अनेक गणेश मंडळांना भेट देवून आरती केली.
श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव निर्विघ्न पार पडावी म्हणून राजे लखुजीराव जाधव यांच्या काळात येथील सावजी परिवाराने मयुरेश्वर गणेश मंडळाची स्थापना केली. सुमारे अडीचशे वर्षा पासून आज तगायात मयुरेश्वर गणपतीची स्थापना करण्यात येते. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मूतीर्ची डिझाईन व्यास आणि उंची सारखी असते,पूर्णत: मातीची इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्यास गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर सुरुवात होते. सुमारे तीन क्विंटल वजनाच्या या मूतीर्साठी कुंभार माती उपलब्ध करून देतात.अनंत चतुर्थीच्या एक दिवस अगोदर नवसाला पावणाऱ्या या गणेश मंडळाचे विसर्जन केल्या जाते. सध्याच्या सिंथेटिक आर्टिफिशियल गणेश मूर्ती विसर्जन मुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. मात्र श्री मयुरेश्वर गणेश मूर्ती सावजी परिवार स्वत:च्या हाताने पूर्णत: माती चा उपयोग करून तयार करीत असल्याने यापासून पर्यावरणाला धोका नसून ही मूर्ती पूर्णत: इको फ्रेंडली आहे. दर वर्षी प्रमाणे या वर्षीही शहरातील गणपती मंडळाना भेट देण्यासाठी माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा या भागातील आमदार डॉॅ राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थिती लावली सर्व प्रथम त्यांनी नावसाला पावणाऱ्या श्री मयुरेश्वर गणपती भेट दिली आरती केली याप्रसंगी कविश जिंतूरकर, गणेश सवडे, अॅड अर्पित मिनासे, विष्णू रामाणे, धनंजय मोहिते, अरविंद खांडेभराड आदी सावजी गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दोन वर्षापासून सणावर कोरोनाचे सावट होते : माजी मंत्री डॉ शिंगणे
गणपती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो परंतु गेल्या दोन वर्षात कोरोना सारख्या महामारी मुळे निर्बध लावण्यात आले होते म्हणून सण साजरे करण्यात आले नाही परंतु या वर्षी कोरोनाचा सावट नसल्याने यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्सहाने साजरा केला करा असे अवाहान माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले.


No comments:
Post a Comment