Monday, September 5, 2022

माजी मंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते पत्रकार कोटकर यांचा सत्कार

देऊळगांव राजा : अशरफ पटेल
व्हॉइस ऑफ मीडिया च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार मुशिर खान कोटकर यांना माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी एका सत्कार समारंभात सन्मानित केले.
     येथील रामकृष्ण विद्यामंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उत्कृष्ट बैलजोडी धारक शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी यांच्या हस्ते आयोजित करण्या चे तालुका बातमीदार त आला होता. सदर कार्यक्रमात तालुक्यातील ६२ गावाचे उत्कृष्ट बैल जोडी धारक शेतकऱ्यांचा तसेच निरीक्षक यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दैनिक सकाळ चे तालुका बातमीदार तथा साप्ताहिक शब्ददौलत चे संपादक मुशीर खान कोटकर यांची महाराष्ट्र स्तरावर पतगारांच्या कल्याणासाठी कार्य करणारी संघटना व्हॉइस ऑफ मीडिया च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अँड नाझेर काजी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव म्हस्के, राजेन्द्र डोईफोड़े, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, मतदार संघ अध्यक्ष गजानन पवार, शहराध्यक्ष अर्पित मीनासे, सिताराम चौधरी, नितीन शिंगणे, आदींची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment