शिवसेनाच्या वतीने तहसीलदाराला निवेदन
देऊळगावराजा : अशरफ पटेल
शिवसेना आमची असे शिंदे व ठाकरे गट सांगत असतांना बुलडाणा शहरात ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाºयांचा सत्कार मेळावा सुरु होता त्या सत्कार सोहळ्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व त्यांच्या मुलासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राडा केला व गुंडागिरी करीत काही शिवसेनेचे पदाधिकाºयांवर हल्ला केला होता. त्यासाठी स्थानिक शिवसेनेच्या वतीने दादागिरी करणाºयां शिंदे गटातील लोकांनवर कारवाई करा अशी मागणीचा निवेदन तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बुलडाणा येथील बाजार समितीच्या शेतकरी भवन सभागृहात शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाºयांच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, छगण मेहत्रे, आशिष राहाटे व सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रम सुरु असतांना घोषणा बाजी करत शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड समर्थकांनी खुर्च्यांची तोउफोड केली. दरम्यान विधानसभा संपर्कप्रमुख संजय हाडे यांना मारहान करीत आमचीच खरी शिवसेना अशा घोषणा देत छगन मेहत्रे यांना धक्काबुक्की करीत लागकांना मारहण करीत होते. आमदार संजय गायकवाड समर्थक व त्यांचे पुत्र कोणाल गायकवाड यांच्या वर कारवाई करावी अशी मागणीचा निवेदन देऊळगावराजा शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, शिवसेना नेते डॉ.रामप्रसाद शेळके, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, राजु नागरे, गिरीष वाघमारे, अजय शिवरकर, वसंतअप्पा खुळे, गजानन शेळके, सै.निसार, मधुकर रायमुल आदी शेकडो शिवसैनिकांच्या स्वक्षºया आहे.



No comments:
Post a Comment