Monday, September 5, 2022

पशुधन वाचविने काळाची गरज : माजी मंत्री डॉ. शिंगणे


 उत्कृष्ट बैलजोडी निवड व शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभ सोहळा संपन्न

  देऊळगावराजा : अशरफ पटेल

       भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकरी जगला तर देश सुखी व समृद्ध होईल या उदात्त भावनेतून शेतकºयांसाठी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने दरवर्षी पोळा या दिनी बळीराजासोबत एकनिष्ठ असलेला सर्जा-राजा कष्ट करून बळीराजाला समृद्ध व सधन करतो. यासाठी पशुधन वाचविने काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले.

          पक्षाचे प्रांतध्यक्ष जयंतराव पाटील आणि बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या सुचनेनुसार  तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दि.५ स्पटेंबर रोजी उत्कृष्ट बैलजोडी निवड व  शेतकºयांचे सत्कार समारंभ सोहळा आयोजित कºणयात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगण तथा प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी होते. याप्रसंगी संतोष पाटील, राजेन्द्र डोईफोडे, सिताराम चौधरी, संतोष खांडेभराड, प्रा.दिलीपकुमार झोटे, हरीश शेटे, गजानन पवार, अ‍ॅड.अर्पित मिनासे, एल.एम.शिंगणे, रंगनाथराव कोल्हे, सरस्वती टेकाळे, मंदा शिंगणे, रेखा पवार, नितिन शिंगणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उद्धव म्हस्के यांनी उपस्थिती जनसमुदाय समोर कार्यक्रमाची रुपरेशा मांडली. याप्रसंगी तालुक्यातील ६० गावातील  मुक्या सहकायार्ची निगा करणाºया बळीराजाचा सन्मान व सत्कार शाल, टोपी, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वाईस आॅफ मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष पदी मुशीर खान कोटकर निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.काझी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, पोळ्याच्या निमित्ताने आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी गावातल्या पोळ्यामध्ये येणाºया उत्कृष्ट बैल जोडीचा त्यांच्या मालकांचा सत्कार हा पक्षाच्या वतीने केला गेला पाहिजे. या उदात हेतूने बैल जोडीचा सत्कार त्याच्या मालकाचा सत्कार खुप सुंदर रित्यशा घेण्यात आलेला आहे. पुढे बोलतांना डॉ.शिंगणे म्हणाले की, कितीही तुम्ही तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न केला तर बैलाचं महत्त्व जे आहे ते त्या ठिकाणी कमी होणार नाही हे चित्र पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आणि म्हणून शेतकºयांचा सन्मान करणं त्यांच्या पाठीशी उभे राहणं आपली जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कोल्हे यांनी केले तर आभार सदशिव मुंढे यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश सवडे, गणेश बुरकुल, राजीव सिरसाट, सै.करीम, गजानन चेके, विष्णू बनकर,अरविंद खांडेभराड, धनंजय माहिते, बैरागी व तालुक्यातील शेतकरी व नागरिक हजारोच्या संख्येत उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment