Friday, September 2, 2022

सामाजिक उपक्रमातून गणेश मंडळांनी आदर्श निर्माण करावा : तहसीलदार धनमने

 


 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा येथे शांतता समितीची बैठक संपन्न.!
  देऊळगावराजा :  अशरफ पटेल
           गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अशा या वातावरणात जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उत्सव आनंद व उल्हासात साजरा करण्यासाठी शांतता व जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन तहसीलदार श्याम धनमने व पोलिस निरिक्षक जयवंत सातव यांनी आयोजित शांतता समिती बैठकीत केले.  
       स्थानिक पोलिस स्टेश्नच्या प्रांगनात दि.१ स्पटेंबर रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्याम धनमने होते. तर प्रमुख उपस्थितत माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, पोलिस निरिक्षक जयवंत सातव होते. पुढे बोलतांना तहसीलदार धनमने म्हणाले की,  गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वाटप, गरजूंना मदत,व्यसनमुक्ती, नशामुक्ती ह्याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवुन गणेश उत्सव साजरा करावा असे आव्हान केले. ठाणेदार सातव म्हणाले की,  गणेश उत्सव मिरवणुकी मध्ये गाणे नेमके कोणते लावावे याचे भान गणेश मंडळाला असले पाहिजे याची दक्षता घेणे गरजेचे आहे , आपल्या मिरवणुकीत महिला सहभागी न होण्या मागचे कारण आहे , नको त्या गाण्यावर आपण धिंगाणा घालतो म्हणून महिलांचा सहभाग यामध्ये नसतो, त्यामुळे सामाजिक भान ठेवून आपण वागलं पाहिजे व  मुर्ती विसर्जन करत असताना पाण्यामध्ये हार, फुल किंवा इतर कचरा टाकू नये अश्या सूचना जयवंत सातव यांनी दिल्या. शहराची लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे शहर आहे, दोन वर्षांच्या कोरोनाच्या निबंर्धामुळे गणेशोत्सव पाहिजे त्या प्रमाणात गणेशभक्तांना साजरा करता आला नव्हता.आता कोरोनाचे सर्व निर्बंध संपले असताना राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशभक्त आनंदात असून यंदाचा गणेशोत्सव ते धूम धडाक्यात साजरा करणार आहेत. गणेशोत्सव काळात व विसर्जनाच्या दिवशी मंडळाकडून काही अनुचित प्रकार होणार नाहीत यासाठी आवश्यक ती नियमावली व सूचना शांतता समितीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक पो.निरीक्षक डी एम वाघमारे, पालिका अधीक्षक राजेंद्र गोरे यांची   उपस्थिती होती. गणेश मंडळांच्या समस्या बाबत विषयी अध्यक्ष व सदस्यांनी मांडली यावंळी शहरातील राजकीय, सामाजिक, पत्रकार, व्यपारी यांच्या सह पोलीस स्टेशन कर्मचारी,गणेश मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment