पुणे-आळंदी मार्गावर अपघाती मृत्यू
पाडळी शिंदे ( स्वप्नील शिंदे ) : देऊळगाव राजा तालुक्यातील मेंडगाव येथील रहिवासी कैलास महादु घुगे हे २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. लान्स नायक असलेल्या घुगे यांना सद्यस्थितीत उत्तर प्रदेशातील मथुरा येथे पोस्टिंग देण्यात आली होती. सैन्यदलाच्या कामासाठी ते २८ ऑगस्टला पुणे येथे गेले होते. पुणे-आळंदी मार्गावर रात्री ८ वाजता दुचाकीने निघाले असताना बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. २९ ऑगस्टला मिलिटरी रेजिमेंटमध्ये सर्व सोपस्कार झाल्यानंतर कैलास घुगे यांचे पार्थिव राहत्यागावी मेंडगाव येथे आणण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. .

यावेळी आ.डॉ. शशीकांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, तहसीलदार दीपक बाजड, ठाणेदार विनायक कारेगावकर, भुसावळ मिलिटरीचे नायक सुभेदार सुखदेवसिंग लाल, हवालदार विघोरे, मोहनसिंग, सतीश उगलमुगले, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश मांटे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे जगदाळे, सोनटाके, अधीक्षक गायकवाड, पीएसआय कवास, मंडळ अधिकारी मोगल मंडळ यांच्यासह उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित पोलीस दलाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून सलामी दिली. नऊवर्षीय मुलगा कार्तिकने वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे कर्तव्य बजावणाऱ्या लान्स नायक कैलास घुगे यांचा पुणे-आळंदी मार्गावर २८ ऑगस्टला रात्री अपघाती मृत्यू झाला. सैन्यदलाच्या कामानिमित्त पुणे येथे आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मूळगावी मेंडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली..

No comments:
Post a Comment