पशु वैद्यकीय हॉस्पीटलच्या इतिहासात पहिल्यांदाच
तासभर चालले आॅपरेश्न : ४ पिलांपैकी एक बचावले
देऊळगावराजा : प्राण्यांचे मरण माणसाच्या दृष्टीने क्षूल्लक बाब ठरते. अनेकदा रस्त्यावर आडवे जाणारे प्राणी वाहनांच्या अपघातात मृत्यूमुखी पडतात. मुक्या प्राण्यांवर दया करा अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती असली तरी अलीकडे प्राण्यांप्रती माणसांच्या असली तरी अलीकडे प्राण्यांप्रती माणसांच्या संवेदना बोधट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र बुलडाण्यात मरणाला टेकलेल्या एका पाळीव मांजरीचे बुलडाण्यातील पशुचिकित्सालायाच्या चमूने प्रथमच सीझरची शास्त्रक्रिया करुन तिच्या एका पिल्लयाचेही प्राण वाचविले आहे. जिल्ह्याचे इतिहासात मांजरीच्या सीझरची घटना ही पहिली घटना म्हणून नोंदविण्यात आली आहे.
समानता कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा मांजर हा प्राणी आहे. मांजर पाळीव असले तरी स्वत:चे स्वातंत्र्य आणि आब राखून असते. पाळीव असूनही मांजरांचा अनेक उंबºयावरचा भटका शिस्ता आजही गाव आणि शहरात दिसून येतो.फ्लट संस्कृतीकृतीमुळे शहरी निमशहरी भागामध्ये कुत्र्याप्रमाणे घरामध्ये मांजर जाणिवपूर्वक बाळगले जाणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. चार घरी फिरणाºया मांजरीचे चित्र एकाच घरात २४ तास विसावणाºया मांजरी मध्ये परावर्तीत झाले आहे. बुलडाण्यात अशहच एक पांढºया शुभ्र रंगाची गुणवैशिष्टा असणारी मांजर मुस्लिम भगीनी सायरा बानो यांच्या मालकीची आहे. अबोल अश्या मांजरीची दिवसभर पोटामध्ये प्रचंड वेदना असल्याचे जाणवत होते. परंतु त्या वेदना सायरा बानो यांना समजल्याने त्यांनी तात्काळ बुलडाण्यातील पशुचिकित्सालय गाठले वेळ होती सकाळचे ९.३० वाजता जेव्हा सायरा बानो यांनी अबोल मांजरीला पशुधनविकास अधिकारी विलास मोरे यांना तपासणीसाठी दाखवले त्याच बरोबर डॉक्टरांनी सलाईन व इंजेकशन देवून मांजरीला प्रस्तृतीची वेदना होत आहे. असे सांगितले परंतु वेदला तिव्र झाल्यानी तिचा प्रसवकळा थांबत नसल्याने सीझर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी पशुधनविकास अधिकारी विलास मोरे डॉ.डि.एन.काळे, डॉ.आर.बी.पाचरणे, डॉ.बचाटे, परिचर अशोक गवाई व पुर्ण चमू सदर मांजरीच्या शास्त्रक्रियेसाठी सज्ज झाले. तब्बल तास भरात यशस्वी शास्त्रक्रिये तिन मृत आणि एक जिवंत पिल्लांना अबोलीने जन्म दिला. मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात इतिहासात मानवी संवेदना जाग्या झाल्या, अन सीझरने झाली मांजरीची प्रस्तृत्ती...


खूप छान बातमी भाई
ReplyDeleteधन्यवाद
Delete