Friday, August 31, 2018

बीएसएफ सैनिक अर्चना शिंदेचा : आ. खेडेकरांकडून गौरव .

पाडळी शिंदे : बॉर्डर सेक्युरिटी फोर्समध्ये निवड होऊन कर्तव्यावर हजर झालेल्या आणि गावाची मान अभिमानाने उंचाविणाऱ्या अर्चना शिंदे यांचा आ.डॉ. शशीकांत खेडेकर यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
        बीएसएफचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून अर्चना शिंदेची राजस्थानमधील गंगानगर येथे पोस्टिंग झाली आहे. गावी सुटीवर आली असता आ. खेडेकर यांनी तिचा गुणगौरव केला. सोबतच तिचे वडील अच्युतराव व आई गोदावरी शिंदे यांचा हृदयसत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आ. खेडेकर यांचा बोंडअळी अनुदानातून वगळण्यात आलेल्या पाडळी शिंदेसह ३३ मंडळांचा समावेश केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मातृतीर्थ सिंदखेड राजाच नव्हेतर जिल्हावासीयांना तिच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार आ. खेडेकर यांनी काढले. याप्रसंगी माजी सरपंच मीना शिंदे, भारत शिंदे, हिंमतराव शिंदे, स्वप्निल शिंदे, दीपक शिंदे, रमेश शिंदे, गुलाबराव शिंदे, विष्णू शिंदे, बबन शिंदे, रवींद्र शिंदे, गजानन शिंदे, पंढरी शिंदे, सुधाकर शेळके, समाधान शिंदे, वसंतराव शिंदे, श्रीकृष्ण शिंदे, रंगनाथ शिंदे, देवीदास शिंदे, विशाल शिंदे, मधुकर मिसाळ, मधुकर शेळके, राजू शेळके, माधव शिंदे, गोरखनाथ उगले, राजू ठेंग, संदेश शिंदे, संदीप शिंदे, चंद्रकांत शिंदे, द्रोपदी शिंदे, क्याणी शिंदे, दुर्गा शिंदे उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment