Friday, August 31, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

इच्छूकांनी अर्ज सादर करण्याचे सभापती कल्याणी शिंगणे यांचे आवाहन
 देऊळगाव राजा : राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी बांधवाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंमलात आणली आहे..
या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही योजना या प्रवर्गातील शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता अंमलात आणली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक अर्जदार शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. या योजनेतंर्गत नविन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरींग, पंपसंच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच आदी बाबींकरीता अनुदान देण्यात येणार आहे. नविन विहीरी, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरींग , पंपसंचसाठी वीज , शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकर, ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संचाकरीता अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याकरीता किंवावा अधिक माहितीसाठी तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषि विभागात, कृषि अधिकारी यांचेकडे ऑनलाईन अर्जासाठी संपर्क साधावा. तसेच स्वयंसाक्षांकित केलेला अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात ९ सप्टेंबर २०१८ पूर्वी सादर करावे, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती कल्याणी शिंगणे यांनी केले आहे. 
  असा सादर करावा अर्ज.
       इच्छुक अर्जदारांनी या संकेतस्थळावर दर्शविलेल्या लिंकवर या युआरएल वर जावून नविन युजर येथे नोंदणी करावी. अशाप्रकारे अर्जदाराने नोंदणी करून संपूर्ण माहितीसह आवश्यक त्या सर्व दस्ताऐवजासह अपलोड करावे. ऑनलाईन असलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यावर अर्जदाराने स्वाक्षरी करून व ऑनलाईन अटॅचमेंट केलेले सर्व दस्ताऐवज पंचायत समिती कार्यालयात कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावे. तसेच ग्रामसभेचा ठराव, लाभार्थीने शासकीय योजनेतुन विहीरीचा लाभ न घेतल्याचा दाखला, अर्जदाराचा फोटो आदी कागदपत्रासह अर्जदाराने प्रस्तावाची प्रत पंचायत समिती पातळीवर सादर करावी.

No comments:

Post a Comment