Friday, August 31, 2018

खल्ल्याळ गव्हाणच्या महिला दारु बंदीसाठी आक्रमक

महात्मा गांधी तंट्टामुक्ती समिती व महिला दारु बंदीच्या वतीने निवेदन 


देऊळगावराजा : गेल्या अनेक वर्षापासून देऊळगावराजा तालुक्यातील खल्ल्याळ गव्हाण येथे अवैध रित्या दारु विकण्याचे काम जोरात सुरु होते. चार वर्षापासून लेखी व तोंडी तक्रार करुनही पोलिस प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही अवैध दारु विक्री मुळे महिलांना व लाहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने दि.३१ आॅगस्ट रोजी खल्ल्याळ गव्हाण येथील महात्मा गांधी तंट्टामुक्ती समिती व महिला दारु बंदीच्या वतीने पोलिस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
         अवैध रित्या दारु विक्री मुळे खल्ल्याळ गव्हाण येथील महिलांना व शाळेतील विद्यार्थ्यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. सन २०१४ मध्ये अनेक अर्ज तोंडी व लेखी स्वरुपात देण्यात आले. त्यामुळे पोलिस प्राशासना कडून कारवाई सुद्धा करण्यात आली होती. परंतु पुन्हा हा दारु विक्री करण्याचा व्यवसाय सुरु झाल्याने आणि दारु विक्रीत वाढ झाल्याने शाळेतील शिकणाºया लहान मुलांनवर याचा गंभीर परिणाम होतांना दिसून येत आहे. दारु पिवून घिगाना घालणाºया मुळे महिलाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खल्ल्याळ गव्हाण येथे अवैधरित्या दारु विक्री करणाºयांवर त्वरीत कारवाई करुन दारु मुक्त करावे अशी मागणी पोलिस उपविभागीय अधिकारी भिमानंद नलावडे यांच्याकडे निवेदन द्वारे करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे. असे निवेदनात सांगण्यात आले आहे. या निवेदनावर देविदास दंदाले, गजानन दंदाले, माधव जारे, एकनाथ बकाल, मंगला दंदाले, कविता पिछोरे, शोभा पोंधे, ज्योती दंदाले, कविता दंदाले, सिंदू दंदाले, संगीता डोंगरे, वनिता बनकर, अर्चना दंदाले, सुनिता दंदाले, अश्वनी दंदाले यांच्या स्वक्षºया आहे.     


   

No comments:

Post a Comment