Tuesday, September 11, 2018

स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या ताब्यात आहे याचे आत्मपरिक्षण करावे - आ.डॉ.खेडेकर

                                 
 चोरांच्या उलट्या बोंबा, पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला टोला
प्रसिद्धी साठी काही पण, माहिती घ्या नंतर बोला,
पंचायत समितीच्या तात्कालीन सभापती आणि सदस्याना माहिती नाही का ?
देऊळगावराजा : (सुषमा राऊत)
            संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्प गेल्या अनेक दिवसापासून पाण्याच्या आरक्षण संदर्भात चर्चेत आालेला आहे. तुमची सत्ता असतांना जिल्ह्या बाहेर पाणी गेले तेव्हा जलसंपदा मंत्री अजित पवार होते. तेव्हा पत्रकार परिषद घेवून त्यांचा विरोध का करण्यात आला नाही, आणि आज रोजी खडकपूर्णा प्रकल्पातील एकही थेंब पाणी बाहेर जावू देणार नाही अशी पोकळ गर्जना केली आणि प्रसिद्धी करुन घेतली, तुमच्या ताब्यातील संबधित पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती कोणाच्या दबावाखाली ठराव देतात, गट विकास अधिकारी ग्रामपंचायतीला पत्र पाठवतात तेव्हा संबधित तात्कालीन पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी वेळेवर काळजी घेतली असती तर जिल्ह्या बाहेर जाणाºया पाण्याला वाट मिळालीच नसती याला जबाबदार कोण याचा विचार करायला हवा होता, ज्यांनी आतापर्यंत तब्बल २० वर्ष सत्ता उपभोगली त्याच्या काळामध्ये किती पाणी जिल्हयाबाहेर गेले याची माहिती आहे का माहिती घ्या नंतर बोला, आतातर अजबच झाले चोरांच्या उलट्या बोंबा, पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला असा टोला मारुन घणघणीत आरोप क रीत आत्मपरिक्षण करावे असा सल्ला राष्ट्रवादीला सिंदखेडराजा मतदार संघातील आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
    

             स्थानिक स्वरूची हॉटेलवर दि.१० सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिपक बोरकर, तालुका प्रमुख दादाराव खार्डे, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, नगरसेवक अजय शिवरकर, वंसतअप्पा खुळे, शहर प्रमुख मोरेश्वर मिनासे, धनशिराम शिंपणे,जगदीश कापसे, अनिल चित्ते, संदिप कटारे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.खेडेकर म्हणाले की, बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या शहरासाठी ज्या नळयोजना मंजुर झाल्या  त्यासाठी तरी पाणी आरक्षण करुन ठेवले का देऊळगावराजा शहरासाठी २००९ मध्ये पाणी पुरवठा योजना मंजुर झाली होती तेव्हा २.५० द.ल.घ.मि आरक्षण मंजुर झाले परंतु ३ वर्षा पर्यंत तात्कालीन नगर पालिकेने करारनामा न केल्यामुळे बुलडाणा आणि सिंदखेडराजा यांचे देखील आरक्षण रद्द झाले. सध्या देऊळगावमही व मेरा बु. या ठिकाणी कार्यन्वीत झालेल्या नळ योजनांसाठी मंजुर झालेले आरक्षण दफ्तर दिरंगाईमुळे रद्द झाले. संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प मतदार संघात असतांना मतदार संघातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. मागील काळात राष्ट्रवादी सत्ते मध्येच ही चुक झालेली आहे. सत्ता असतांनाही हे पाणी आरक्षीत का झाले नाही याचे उत्तर तात्कालीन सत्ताधाºयांना द्यावे लागेल, खडकपूर्णा प्रकल्प हा सिंदखेडराजा मतदार संघात आहे. या प्रकल्पाचे पाणी सिंदखेडराजा मतदार संघातील आर्थिक दृष्ट्या मापदंडामध्ये बसणाºया गावासांठी झाले पाहिजे हा त्यांच्या न्याय हक्काचा आहे. जालना आणि मंठा, परतुर या तालुक्यातील गावासाठी संत चोखा सागर या जलाशायातून जी नळयोजना प़्रस्तावित आहे. त्याला प्रचंड विरोध आहे. राष्ट्रवादी पक्षावर पत्रकार परिषदे मध्ये तात्कालीन कार्यप्रणालीवर घणघणीत आरोप केले. त्यानंतर  सिल्लोड आाणि भोकरदन या ठिकाणी पाण्याचे आरक्षण रद्द करावे अशी मागणी करण्यात आली. सिंदखेडराजा मतदार संघातील नळ योजना आणि पाण्याचा आरक्षण होणार असल्याची ग्वाही या पत्रकार परिषदेत आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी दिले आहे.

                    पाणी मिळणार का ?
           आरोप प्रत्यारोपाने संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी चांगलेच पत्रकार परिषदांमध्ये ढवळून निघाले आहे. तर येणाºया काळात मतदार संघाला खडकपुर्णा प्रकल्पाचा पाणी मिळणार का असा प्रश्न जनसामान्यांना  निर्माण झाला आहे. 


2 comments:

  1. एकदम योग्य आणि अभ्यासपूर्ण नेता. पुर्ण माहिती तोंडपाठ म्हणजे स्वतःला कामात झोकून दिलेले दर्शविते

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ.शशिकांत खेडेकर साहेब

      Delete