Tuesday, September 11, 2018

सुसंस्कृत नागरिक निर्माण करते तेच खरे शिक्षण.. ठाणेदार बळीराम गीते

देऊळगावराजा (प्रतिनिधी)
          विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या समतोल आणि सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असल्यामुळेच सुसंस्कृत नागरिक निर्माण करते तेच खरे शिक्षण असे प्रतिपादन सिंदखेडराजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार बळीराम गीते यांनी केले.
           स्थानिक देऊळगावराजा शिक्षण संस्था देऊळगाव राजा द्वारा संचालित देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगावराजा मध्ये स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने सांस्कृतिक विभाग व स्वच्छता विभागाच्या च्या वतीने दि. 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त व्याख्यानाच्या आयोजित  कार्यक्रम प्रसंगी केले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांची प्रतिमा तथा वृक्ष पूजनाने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.आर.थोरवे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक डी.ए.खांडेभराड, छायाचित्रकार तथा दैनिक देशोन्नती चे सिंदखेडराजा चे शहर  प्रतिनिधी गजानन मेहेत्रे व भीमगर्जना सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश म्हस्के उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतातून चारित्र्य संवर्धनासह श्रमप्रतिष्ठा जपत स्वच्छ भारत अभिमान यशस्वी करण्याचे आवाहन प्राचार्य एम.आर.थोरवे यांनी केले. कार्यक्रमात कु.भूमिका बंग हिने स्वच्छता अभियानावर सुंदर गीत सादर केले. यावेळी प्रास्तविक प्रा.गजानन गाडेकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले व उपस्थितांचे आभार शशिकांत अग्निहोत्री यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग देऊळगाव राजा हायस्कूल ,शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment