Monday, September 10, 2018

इंधन दरवाढीविरोधात देऊळगावराज कडकडकडित बंद


कांग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वभिमानी सह २१ संघटनानी दिला पाठीबा
देऊळगावराज : (प्रतिनिधि)     
        भाजप म्हणत होते ७० वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवतो. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. प्रत्येक ठिकाणी जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाही. सिलिंडरचे दर चारशे रुपयांहून आठशेवर गेले आहेत. देशाला जी गरज आहे, त्यावर ते एक शब्द बोलत नाहीत, अशी जोरदार टीका देऊळगावराजा येथे काँग्रेस पक्षयच्या वतीने  करण्यात आली आहे .
           केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला असून, आज दि.१० सप्टेंबर रोजी देशभरात 'भारत बंद'ची हाक दिली आहे. सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी बंद पुकारला आहे. 


    बंद काही अप्रमीत घटना घडू नये या साठी पोलिस प्रशसानाकडून चोख बंदोबस्त करण्यात आलेला होता . या वेळी तालुका बंद करुण शांतातेने शहरात मोर्चा काढून आंदोलन केला.

No comments:

Post a Comment