लाखो रुपयेची अवैध देशी दारुच्या उलाढालीवर केवळ ५३०० रु. माल जब्ती
५ अवैध देशी दारु विकेत्यांवर कारवाही
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर मद्यपींनी आपला मोर्चा अवैध दारु विक्री करणाºयांवर वळविला आहे. कोणताही सण असो शासनाकडून बंद असलेल्या दिवसी दारु भेटत नाही पण या उलट देऊळगावराजा तालुका आणि शहरी भागात अवैध रित्या तालुक्यातील ग्रामीण भागात शहरी भागात दारूचा महापूर आला असून यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. तर पोलिस प्रशासनाकडून थातूर मातूर कारवाई करुन दोन दिवसात ५३०० रु माल जब्त करुन ५ जणांवर कारवाई करुन माल जब्त केला.
काही महिन्यापासून शहरातील बार, दारू व वाईनशॉपच्या दुकानांना पुन्हा परवानगी मिळाल्याने सर्रास दारु विक्री होत आहे. यात वर्षात काही दिवस बंद ठेकवण्याचे आदेश असूनही शहरात बंदच्या दिवशी देशी दारूचे दुकान सुरू असल्याने या ठिकाणी दारू पिणाºयांची दररोज तोबागर्दी दिसत आहे. तालुक्यात अवैध दारू विकणाºयांची संख्या वाढत चालली आहे. या ठिकाणी अवैध देशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात छुप्या मागार्ने जात असून गावात खुलेआम दारूची विक्री होत आहे. दारू पिणाºयांच्या भीतीमुळे घरातील महिलांना व शाळकरी मुलींना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र, पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून अवैध रित्या देशी दारु विकणाºयांवर कोणतीच ठोस कारवारही होत नसल्याने हा धंदा सर्रास सुरु आहे. दि.९ सप्टेंबर रोजी पोळा सण या निमित्ताने बंद असूनही शहरात आणि तालुक्यात हजारो रुपयाची दारु सर्रास विक्री होतांना दिसुन येत आहे. तर पोलिस प्रशासनाकडून थातुर मातुर कारवाही करुन दोन दिवसात ५ जणांवर कारवाई करीत ५३०० रुपयाचा माल जब्त करुन गणेश तातेबा खार्डे, प्रकाश भिमराव काकडे, अशोक तुकाराम खार्डे, नसीम खान सलीम खान, सतिष तुकाराम खुपसे आदींवर कारवाही करुन गुन्हा दाखल केलेला आहे. तरीही काही ठिकाणी पोलिसांनी कारवाही न केल्याने तालुक्यात पोळाच्या दिवशी लाखो रुपयाची अवैध देशी दारु विक्रीची उलाढाल झाल्याची शहरात चर्चेला उधान आले आहे.

No comments:
Post a Comment