भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा सोबत एक निष्ठ सहवास
स्व.हाजी उस्मानसेठ मिरचीवाले यांच्या कुटुंबाला दिली सांत्वनपर भेटदेऊळगावराजा : (अशरफ पटेल)
गेल्या ६ दशकापासून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षा सोबत एकनिष्ठ राहून सामाजिक तन मन धनाने कार्य करणारा आमचा मातृतीर्थातील लाल हरवला आहे. स्व.हाजी उस्मानसेठ मिरचीवाले यांच्या अचानक पणे जाण्यामुळे कॉग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. असे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे महासचिव तथा माजी खासदार मुकुल वासनिक यांनी देऊळगावराजा येथे जनतासेवा याच्या निवास स्थानी सांत्वनपर भेटीत परिवाराशी बोलत होते.
श्री बालाजी महाराजांच्या पुण्य नगरीतील प्रतिष्ठित उद्योगपती ज्येष्ठ नेते हाजी मोहम्मद उस्मान सेठ मिरचीवाले यांचे दि.१५ जुलै रोजी ह्दयविकाराच्या तिव्र धक्कयाने दु:खद निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच मातृतीर्थ मतदार संघात जनतासेवा हे नाव परिचित आहे. नावा प्रमाणेच सर्व धर्मियां सोबत जिव्हाळ्याचे सबंध अखेरच्या श्वासा पर्यत जोपासुन जनतासेवा हे नाव अख्या महाराष्ट्रात अजरामर केले आहे. जनतासेवा हे नाव समोर येताच स्व.हाजी मोहम्मद उस्मान सेठ मिरचीवाले यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांच्या या जनसेवा व एकनिषष्ठता याकार्य कतृत्वाचे धनी होते. राजकीय क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या आठवनीना उजाळा तसेच परिवाराशी घनिष्ट सबंध या ऋणाबंधनात अडकलेले भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे महासचिव तथा माजी खासदार मुकुल वासनिक दि.११ स्पटेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता यांनी आपल्या बहूमुल्य वेळेत वेळ काढून स्व.हाजी मोहम्मद उस्मान सेठ मिरचीवाले यांच्या कुटुंबास भेट दिली. त्यावेळी गहीवरून बोलतांना वासनिक म्हणाले की, राजकीय क्षेत्रात त्यांनी कोणतीच लालसा केली नाही त्यांचा मुळ उद्देश होता गरीबांची मदत करणे आणि काँग्रेस पक्षाला मजबुत बनविण्यासाठी तसेच सामाजासाठी काही तरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती त्यांनी स्वार्थासाठी कोणतेच कार्य केलेले नाही समाजात सदभाव टिकविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या वाटचालीवर व संस्काराने आजही त्यांचे संपूर्ण कुंटुब चालत आहे. त्यांच्या अचानक पणे जाण्यामुळे आम्हाला आघात पोहचलेला आहे. त्यांची पोकळी आम्हाला सदैव जानवत राहील ते कधीही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विसरु शकणार नाही. त्यांच्या पश्चात आम्ही संपूर्ण परिवारा सोबत कायम राहणार आहोत. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:
Post a Comment