नगर पलिकेची पहिली शाळा डिजिटल
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
शहरातील नगर पालिका उर्दु प्राथमिक शाळा डिजिटल झाली आणि प्रत्येक शाळांत डिजिटल वारे वाहू लागले. संपूर्ण महाराष्ट्रभर डिजिटल शाळा हा पॅटर्न शिक्षण क्षेत्राने उचलून धरला. आता शहरातील नगर परिषदेच्या शाळांना डिजिटल शाळांचे वेध लागले असून येत्या काही महिन्यात नगर परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजिटल होणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांनी केले आहे.
स्थानिक नगर परिषद उर्दु प्रथामिक शाळेच्या भव्य प्रांगणात दि.१२ सप्टेंबर रोजी डिजिटल शाळा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक बालाजी नगरीच्या प्रथम नागरिक सुनिता शिंदे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष पवन झोरे, शिक्षण सभापती पल्लवी वाजपे, गट शिक्षणअधिकारी दादाराव मुसदवाले, प्रशासन अधिकारी जगन मुंढे, नगरसेविका विमल माळोदे, नगरसेवक मो.रफीक, हनिफ शाह, डॉ.रामदास शिंदे, मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, पत्रकार गणेश डोके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमच्या सर्व प्रथम भारतमाता आणि शिक्षणाच्या रोपटा लावणाºया सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करुन दिप प्रज्जवलीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गट शिक्षणअधिकारी दादाराव मुसदवाले यांनी सांगितले की, शहरी, ग्रामीण व आदिवासी अतिदुर्गम भागात नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वसल्या आहेत. या सगळ्या शाळा आता डिजिटल होणार आहेत. यातील काही शाळा यापूर्वी डिजिटल झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणामुळे डिजिटल संकल्पनेला वेग आला आणि उर्दु प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपली शाळा डिजिटल करुन दाखवलेली आहे. लोकसहभाग, सीएसआर फंड तर वेळप्रसंगी शिक्षकांच्या खिशातील पैसे असा खटाटोप करत शाळा डिजिटल केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आता पाटीवर गणिते सोडवण्याऐवजी भल्या मोठया स्क्रीनवर सोडवतील. कविता, गाणी, कथा शिक्षकांच्या तोंडून ऐकण्याऐवजी आता उत्तम? संगीतबद्ध केलेल्या माध्यमातून ऐकतील, असा हा सगळा बदल आज पासून नगर परिषदेच्या शाळामाध्ये पाहायला मिळालेला आहे. स्क्रीन, प्रोजेक्टर, पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमाच्या आॅडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील सीडी आणि मॉनिटर अशा प्रकारचे ई-साहित्य विद्यार्थी स्वत: हाताळणार असून या सगळ्या वस्तू एका वर्गात ठेवण्यात आल्या आहेत. वर्गाचे नाव महामनवाच्या नावे देण्यात आले आहे . ही डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांच्या फायद्याची असून शिकण्याचा वेग वाढणार आहे. लोकांनाही डिजिटलचे महत्त्व पटल्याचे प्रशासन अधिकारी जगन मुंढे म्हणाले. याप्रसंगी मल्हार वाजपे, सलीम खान पठाण, ईस्माईल बागवान, अतिष कासारे, निशिकांत भावसार, सुधाकर जायभाये, हारुन शाह आदि शहरातील प्रतिष्ठीत नागरिक पालक वर्ग, विद्यार्थी नगर परिषदेचे शिक्षक व शिक्षत्तेर कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्हि.एम.वाडेकर गुरुजी तर आभार मुख्याध्यापक अमिन खान यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अब्दुल हाई, युनुस खान, फेरोज खान, मुजाहीद खान, शेख मकसुद सर, शिक्षीका अजरा परविन, कनिज फातेमा, अब्दुल मुजीब कर्मचारी शेख महेमुद यांनी अथक परिश्रम घेतले.
न.प. उर्दु प्राथमिक शाळा डिजिटल
शहरी भागातील डिजिटलमधूनच पूर्ण शिक्षण मिळावे, हा संकल्प शासनाने केला आणि त्या उद्देशानेच नगर परिषदेच्या सहकार्य आणि लोकसहभागतून तसेच उर्दु शाळेतील शिक्षकांच्या धोर्याने व प्रशासना अधिकारी जगन मुंढे यांच्या अथक प्रयत्नाने आम्ही सर्वानी मिळून नगर पालिकेची पहिली पूर्णत: डिजीटल शाळेचा लोकार्पण केलेला आहे.
अमिन खान, मुख्याध्यापक न.प.उर्दू प्राथमिक शाळा देऊळगावराजा


No comments:
Post a Comment