चांडक यांना सहकाररत्न, डॉ. शिंगणेंना लोकनेता पुरस्कार तथा आमदार डॉ.खेडेकर यांना शिवरत्न पुरस्कार तसेच उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार सुषमा राऊत यांना
पत्रकारांसह २२ विभुतींचा होणार सन्मान;
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
सामाजिक बांधिलकी ठेऊन समाजहिताचे उपक्रम राबविणारे डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केलेल्या नियोजनानुसार राष्ट्रमाता जिजाऊ बहुऊद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा संचालित राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाघाटन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया प्रतिभावंतांसोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा १५ सप्टेंबरला सत्कार करण्यात येणार आहे. आशिया खंडात बुलडाणा अर्बनचे नाव झळकविणारे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना सहकाररत्न तर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना लोकनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनल शेळके व सचिव डॉ.रामप्रसाद शेळके यांच्या वतीने दरवर्षी विभुतींचा सन्मान करण्यात येतो. यानिमित्त सिंदखेड राजा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे हे आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सहकार क्षेत्रात देश-विदेशात बुलडाणा अर्बनचे जाळे पसरविणारे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विकसनशील समाजाचे राजकीय क्षेत्रातून उदयोन्मुख प्रतिनिधी म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांना लोकनेता पुरस्काराने गौरविले जाणार आहे. माजी आमदार तोताराम कायंदे यांना शिक्षणरत्न , आमदार डॉ. शशीकांत खेडेकर शिवरत्न, नगराध्यक्षा सुनीता शिंदे जिजाऊ पुरस्कार , उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर चेके पाटील, जालन्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गोर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमानंद नलावडे, जालना येथील कोठारी उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयकुमार कोठारी, राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचे सचिव समाधान सावळे, ठाणेदार सारंग नवलकर, तहसीलदार दीपक बाजड, व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव, सिंदखेड राजा ठाणेदार बळीराम गीते, कवी अजीम नवाज राही, वनश्री जनाबापू मेहेत्रे, उत्कृष्ट खेळाडु म्हणून कु.शारदा शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमधून राज मल्लावत, सुमित कुमठे, विजय पिंपळे तथा पत्रकार क्षेत्रातील मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत यांना उत्कृष्ट पत्रकारीता व पत्रकार सुनिल मतकर, सुरज गुप्ता यांचा गौरव करण्यात येणार आहे.
राजलक्ष्मी कूलचे उद्घाघाटन सोहळा व मान्यवरांचे सत्कार समारंभात उपस्थित राहण्याचे आवाहन : डॉ.शेळके
दि.१५ सप्टेंबर रोजी राजलक्ष्मी स्कूलचे उद्घाघाटन सोहळा व मान्यवरांचे सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष सौ.मिनल शेळके आणि सचिव डॉ.रामप्रसाद शेळके यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment