समाजाच्या वतीने ठाणेदार यांना निवेदनदेऊळगावराजा : (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया द्वारे काही समाजकंटक ना.पंकजा मुंढे आणि खासदार डॉ.प्रितम मुंढे यांच्या विषयी अश्लील भषेचा वापर करुन सामाजिक भावना दुखवण्याचा काम सुरु आहे. नुकतेच खा.डॉ.प्रितम मुंढे यांच्यावर फेसबुक अतिशय अश्लील भाषेचा वापर करणाºया संजय कुºहाडे सामाजिक भावना दुखवल्या असून त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणीचा निवेदन डॉ.सुनिल कायंदे यांच्या नेतृत्वात ठाणेदार यांना देण्यात आले.
सोशल मीडिया वर्तमानकाळातील प्रभावी माध्यम असले तरी ते दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर करताना तारतम्य, विवेक महत्त्वाचा आहे. आपण काय संदेश पाठवतो याचे भान आणि परिणामांची जाणीव आपल्याला असावी पण याची काळजी न करता निगडी पूणे येथील संजय कुºहाडे सहशिक्षक असूनही फेसबुकवर बिडच्या खासदार डॉ.प्रितम मुंढे यांच्यावर अतिशय गलिच्छ भाषेत लीखान केलेल आहे. देशात महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात येते परंतु अशा व्यक्ती मुळे समाजातील वातवरण बिघडत असून या आळा बसण्याकरीता अशा निच वृत्तीच्या वय्क्तीवर तात्काळ गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा द्या अशी मागणी समाजाच्या वतीने ठाणेदार सारंग नवलकार यांना निवेदन दिला. निवेदनात म्हटले आहे की, तात्काळ संजय कुºहाडेला अटक करुन शिक्षा द्या अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आलेला आहे. या निवेदनावर समाजाच्या प्रतिष्ठीत नागरिक आणि युवकांच्या सह्या आहे.


No comments:
Post a Comment