पत्रकार परिषदेत मा.आ.शिंगणे यांचा आमदार वर आरोप
विस वर्षात केलेल्या विकास कामांचा दिला पुरावा
देऊळगावराजा : (सुषमा राऊत)
गेल्या विस वर्षात सिंदखेडराजा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून नविन दिशा देण्याचे काम राष्ट्रवादी सत्ते असतांना मी करुन दाखवली, त्यावेळी कोणत्याही कामांची प्रसिद्धी केली नाही, लोकप्रिय आमदार हे गॅजेटेड आमदार असून ते विकास कामांची पोकळ घोषणा आणि प्रसिद्धी करुन जनतेची दिशाभूल करत आहे आणि मिच ते काम केल्याचा देखावा करुन जनतेला भासविण्याचे काम करीत आहे असा ठणठणीत आरोप माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
स्थानिक चैत्रबन हॉटेलवर दि.१५ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा मतदार संघाचे माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके, गंगाधर जाधव, जि.प.सदस्य रियाज खान पठाण, सभापती सौ.कल्याणी शिंगणे, माजी नगराध्यक्षा सरस्वती टेकाळे, माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड सिदंखेडराजा न.प.उपाध्यक्ष सिमाताई शेवाळे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.शिंगणे म्हणाले की, बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या शहरासाठी ज्या नळयोजना मंजुर झाल्या होत्या काही तांत्रीक अडचनी मुळे ते काम अपूर्व राहीलेले आहे. तर मतदार संघाच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण नसून तुमचा पिण्याचे पाणी कुठे अडविण्यात आलेला आहे. पाण्याचे आरक्षण कधी करता येते येणाºया काळात पिण्याच्या पाण्याचे आरक्षण होणार आहे, यासाठी आम्ही पाठपूरावा करीत आहे. तसेच मतदार संघात कायमस्रुपी पाईप लाईनची मंजुरात, क्रिडा संकुलाची निर्मिती, नगर परिषदेची नविन इमरती, व्यापरी संकुलन, ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेन्टर, उपविभागीय महसूल कार्यलय, उपविभागीय पोलिस कार्यलय, जालना खामगाव महामार्ग साठी प्रयत्न, मतदार संघातील रस्ते, बाजार समितीत गुरांचा बाजार, टिएमसी मार्केट, कोल्ड स्टोरेज, शहराला तिर्थ शहराचा दर्जा, पाझर तलाव, कोल्हापूरी बांध, शादी खाना, शिक्षणासाठी अनेक शाळांची उभारनी अशा विविध हजारो कामांची यादी आहे. आमना नदी खोलीकरणासाठी आमच्या राष्ट्रवदीच्या तात्कालीन नगराध्यक्षा मालती कायंदे, सेवानिवृत्त उपजिल्हा अधिकारी रमेश कायंदे, अप्पर जिल्हा अधिकारी शिवानंद टाकसाळे तसेच पत्रकारांच्या व लोकसहभागतुन झालेले आहे, त्याचे श्रेय लाटण्याचे काम आमदार साहेब करीत आहेत. सध्या स्थीतीत बरेच कामे मार्गी लागुन कार्यन्वीत आहे. तर काही कामांचरी पायाभरणी ही राष्ट्रवादीच्या कार्याकाळात झालेली आहे. असा खुलास देवून पुरावा पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्याच प्रमाणे लोकप्रिय आमदार यांनी पत्रकार परिषदा घेवून विस वर्षात काहीच केले नाही असा आरोप वारंवार माझ्या पेक्षा माझ्या राष्ट्रवादी पक्षावर होत आहे. तर माझा प्रश्न असा आहे की, देऊळगावराजा येथील सिड हब कुठे गेले? डाव्या कालवा म्हणून वाढदिवशीची मुख्यमंत्र्यानी दिलेली भेट कुठे? त्याचा मंत्रलयात धूळखात पडून आहे, ते पुर्ण कधी होणार? सुरु केलेले व्हचूयल डेपो मधील गाड्या किती सुरु आहे? सिदंखेडराजा मतदार संघात ४ वर्षात झालेली ठरविक कामे कोणती? धरणग्रस्तांचे पुर्णवर्सन का झाले नाही? एवढेच नव्हेतर प्रसिद्धीसाठी दत्तक घेतलेले आडगावराजाच्या विकासाचे काय झाले? याचे उत्तर पुराव्यानिशी लोकप्रिय आमदारांनी दिले पाहिजे. आगामी निवडणुका डोळ्या समोर ठेवून दिशाभूल करत खोटे नाटे आरोप करीत आहेत.
आम्ही विस वर्षात काहीच नाही केले त्यापेक्षा आठ ते दहा वर्षाच्या कालावधीत विकास कामांची शुभारंभ करण्यासाठी आमच्या सोबतच होते आणि आज विकास पुरुष म्हणून जे श्रेय लाटत आहे आणि जनतेची दिशाभूल करीत आहे त्यावेळी तो आमच्या सोबत विकास नव्हता का असा मार्मिक टोला देखील यावेळी दिला. शेतकºयांच्या हितासाठी आणि पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी बाहेर जिलह्यात जाणारे पाणी अडवा आम्ही तुमच्या सोबत आहे. नुसत्या घोषणा करत पोकळ प्रसिद्धी करुन घेवू नका असा सल्ला देखील दिला. राष्ट्रवादी पक्ष खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाण्यासाठी सदैव लढणार आणि आमदार असो किंवा नसो जनतेच्या सेवेसाठी कार्य करीत राहणार अशी ग्वाही या पत्रकार परिषदेत दिली.




Nice Ashraf Bhai Keep it Up 👌👌👌👌
ReplyDelete