देऊळगावराजा (प्रतिनीधी)
बुलडाणा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कुलच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त विजयी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासाहित नुकताच प्राचार्य एम आर थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दि. ११ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत कुस्तीमध्ये १४ वर्ष वयोगटात इयत्ता ८ वी चा विद्यार्थी संघपाल मधुकर शिंदे प्रथम आला तर १७ वर्ष वयोगटात इयत्ता १० वी चा विद्यार्थी विजय पांडुरंग घुगे हा देखील जिल्ह्यातून प्रथम आला. या दोघांचाही सत्कार प्राचार्य एम आर थोरवे व पर्यवेक्षक डी ए खंडेभारड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजेता कुस्तीपटू संघपाल शिंदे यांचे पालक मधुकर शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय पातळीवरील यशासाठी विजेत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या यशासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक सतीश मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment