देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
परिस्थिती झपाट्याने बदलत आहे़ आधुनिकीकरणाचा वेग वाढत असताना आपण पारंपरिक पध्दतीने शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही़ सध्याचे शिक्षण हे कोरडवाहू शेतीप्रमाणे असल्याने त्यात कसलेच उत्पन्न निघणार नाही़ त्यामुळे पारंपरीक शिक्षणावर भर न देता आधुनिक शिक्षण ही काळाची गरज लक्षात घेवून दिले पाहिजेच, असे मत राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी नगरीचे प्रथम नागरिक सौ.सनिता शिंदे होत्या
स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात दि.१५ स्पटेंबर रोजी तर प्रमुख पाहूणे म्हणून सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे आदी उपस्थित होते. सर्व प्रथम मॉ सरस्वतीचे पुजन करुन दिप प्रज्जवलीत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वगत गित सादर करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ.रामप्रसाद शेळके यांनी आपल्या प्रस्तसविका मध्ये कार्यक्रमाची रुपरेषा उपस्थितां समोर मांडली या कार्यक्रमात बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक यांना सहकाररत्न, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना लोकनेता, आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांना शिवरत्न, माजी आमदार तोताराम कायंदे यांना शिक्षणरत्न, नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांना जिजाऊ रत्न विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ.खेडेकर, माजी आरोग्यमंत्री डॉ.शिंगणे, माजी आमदार कायंदे, नगराध्यक्षा श्ंिदे यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना चांडक म्हणाले की, शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते. आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल घडला पाहिजे, याविषयी सर्वांचेच एकमत आहे. हे परिवर्तन घडत असताना भारताचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान-परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांचाही समग्रतेने विचार होण्याची आवश्यकता आहे. येणाºया काळात राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यासाठी नविन दिशा ठरणार आहे. याप्रसंगी सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी बहुसंख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार अर्जुन आंधळे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव डॉ.रामप्रसाद शेळके यांनी व्यक्त केले.
एकच व्यासपीठावर आजी - माजी आमदार
यानिमित्त सिंदखेड राजा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे हे आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर आले.



Good👍👍👍
ReplyDelete