गणपती मंदिर साळीवाडा स्थापित तिरुपती गणेश मंडलाचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
बदलत्या काळानुसार गणेशोत्सव देखील हायटेक होत आहे.परंतु शहरातील श्री गणपती मंदिर साळीवाडा द्वारा स्थापित तिरुपती गणेश मंडळाच्या सदस्यांनी पेपरच्या रद्दीपासून श्री गणेशाची पर्यावरणपूरक स्थापना करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
मागील पंधरा वर्षांपासून तिरुपती गणेश मंडळ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करतात.यावर्षी त्यांनी केवळ सहा किलो वजनाची साडे तीन फूट झाडाच्या पडलेल्या पानावर बसून जेवणाचा आस्वाद घेत असलेली कागदाची गणेश मूर्ती तयार केली आहे. गणेश मूर्तीमध्ये दिवसेंदिवस प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर अधिक होत आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते.तलाव, विहीर , नदी यामध्ये मूर्ती विसर्जित केल्यानंतर या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाही तसेच पाण्याचेही प्रदूषण होते .या मूर्तीमध्ये कृत्रिम रंग व केमिकल चा वापर जास्त असल्याने पाणी अधिक दूषित होते पर्यावरणाचे संतुलन व वाढते प्रदूषण विचारात घेता पर्यावरण सवर्धनसाठी अशे पर्यावरण पूरक उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मागील एक महिन्यापासून ही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मंडळाचे सदस्य अनिल जगताप ,ऋतिक जगताप, रोहित आहिरे, सतीश जगताप यानि परीश्रम घेतले ही मूर्ती तयार करण्यासाठी पेपरची रद्दी रंगीत कागद मोरचुद, मैदा व नैसर्गिक रंग इत्यादीचा वापर करण्यात आला.या मूर्तीची स्थापना बांबू व गवता पासून तयार केलेल्या पुराणकालीन झोपडीत केली असून ही मूर्ती सर्व शहर वासीयांचे लक्ष वेधून घेत आहे.सदर पर्यावरण पूरक मुर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. श्री गणपती मंदिर साळीवाडा,व महाकाली दुर्गा उत्सव मंडळाच्या च्या सदस्यनी याना प्रोत्साहित केले आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.

No comments:
Post a Comment