Sunday, September 16, 2018

शेळके परिवार ठरला आदर्श कुटुंब पुरस्काराचा  मानकरी

देऊळगावराजा : (प्रतिनिधि)
       धम्म अभियान संयोजन समिती पुणे महाराष्ट्र च्या वतीने दिला जाणारा आदर्श बोद्ध कुटुंब 2018 चा पुरस्कार फुले-शाहू-आंबेडकर आझाद विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार धम्म अभियान समितीचे मुख्य संयोजक राष्ट्रीय प्रचारक प्रा दी.बा. बागुल यांनी नुकताच जाहीर केला आहे.
         धम्म अभियान समिती बोरखेडी बावरा चे स्वागत अध्यक्ष भुजंगराव खरात, भाई दिलीप खरात, प्राचार्य अशोक खरात, प्रा पंढरीनाथ खरात, सुरेश सुतार, सुभेदार बाबासाहेब खरात, सुभाष सुतार,प्रभाकर खरात माजी सैनिक शिवाजी खरात छगन खरात शिवाजी देवराव खरात रंगनाथ खरात भगवान सदाशिव खरात संजय खरात बाबासाहेब जोडीदार मधुकर खरात गौतम खरात समाधान खरात रवी खरात यांनी फुले शाहू आंबेडकर आझाद विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ रामप्रसाद शेळके यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही शिफारस समितीकडे केली होती या कार्याचा आढावा घेत सदर पुरस्कार ची घोषणा नुकतीच करण्यात आली पुरस्कार 14 ऑक्टोबर धम्म अभियान रथाचे आगमन प्रित्यर्थ आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मपरिषद मध्ये सायंकाळी सहा वाजता डॉक्टर शेळके परिवारास देण्यात येईल. 
                     पुरस्कार मराठा समाजातील एका कुटुंबास       
          डॉ शेळके कुटुंब यांचे सामाजिक कार्य,कुठल्याही जाती धर्मातील परिवारास मदत करण्याची धडपड व सर्व जाती धर्मसोबत असलेला सलोखा याची दखल घेत हा पुरस्कार मराठा समाजातील एका कुटुंबास दिल्या जात असल्याचा आम्हास सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. 
                 प्रा.दि.बा.बागूल : राष्ट्रीय प्रचारक धम्म अभियान संयोजन समिती, पुणे

No comments:

Post a Comment