आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
गेल्या महिनाभरा पासून पावसाने दांडी मारल्या मूळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी करपू लागली आहे गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे ऐन पीक बहरात असतानाच पावसाणे उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकऱ्यांनावर आल्याने, तात्काळ शासनाने सर्व्हे करुन सिंदखेडराजा राजा मतदारसंघ दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा,अशी मागणी मतदारसंघाचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मदन येरावर यांच्याकडे केली आहे.
सप्टेंबर महिना मावळतीला लागला पावसाळ्याच्या चार महिन्याचा कालावधी अवघ्या काही दिवसांत संपत आहे, अनेक दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे.खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन,मका व कपाशी ,ज्वारी हे पिके करपून जात आहे. पावसाचा खंड वीस ते पंचवीस दिवसांपेक्षा जास्त असून सोयाबीन,मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे करपली आहे.अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या दिवसात शेती उत्पादनाच्या आधारावर केलेले नियोजन आता कोलमोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे.तस मतदारसंघातील खडकपूर्णा धरणा सह अन्य छोटे मोठे प्रकल्प कोरडे ठनठणीत तर काही ठिकाणी जलसाठा नगण्य अवस्थेत पोहचल्याने अनेक गावात पिण्याच्या व जनावरांना पाण्यावर व परिसरातील सिंचन क्षेत्रावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे.त्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे गडद सावट कोसळलेली आहे. दमदार पाऊस न पडल्यामुळे खडकपुर्णा धरणात व इतर सिंचन प्रकल्पात पाहिजे तेवढे पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली आहे. अशा या भीषण परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित मतदारसंघात करपत असलेल्या पिकांचा सर्वे करून मतदारसंघ दुष्काळ ग्रस्त घोषित करावा,अशी मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Gramin Bhagat 12 Taas Light Deu Ase Sangitale Ahe 5 Taas Pan Light Tikat Nahi Ahe ... Tari Pekkanna Sdhya Pani Dene Suru Ahe Aani Light Chi Hi Bomb...Ahe
ReplyDeleteलय भारी
ReplyDelete