Monday, September 3, 2018

तरुणसागर महाराजांच्या आठवणींना दिला उजाळा

सर्वधमीर्यांची श्रद्धांजली 
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कडवे आणि परखड विचार मांडणारे व आपल्या कडव्या प्रवचनाने सर्वदूर ख्यातीप्राप्त करणारे जैनमुनि राष्ट्रसंत तरूण सागरजी महाराज यांच्या विविध आठवणींना दि.२ सप्टेंबर रोजी येथे उजाळा देण्यात आला. जैन समाजबांधव तसेच सर्वधमीर्यांच्या वतीने येथील पार्श्वनाथ भवनात श्रद्धांजली सभा पार पडली.
        तरुण सागर महाराज यांचे दि. १ सप्टेंबर रोजी सल्लेखना, समाधीमरण झाले. संपूर्ण जैन समाजासह कोट्यवधी अजैन भक्त ही वार्ता कळताच शोकसागरात बुडाले होते. देऊळगावराजा येथे दि. २ सप्टेंबर रोजी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सिंदखेडराजा मतदार संघाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्षा सौ. सुनिताताई शिंदे, डॉ. रामप्रसाद शेळके, डॉ. गणेश मांटे यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक, महिलांची उपस्थिती होती. केवळ जैनांच्याच नव्हे तर अजैनांच्या मनात कडवे प्रवचनाच्या माध्यमातून घर निर्माण करून गेलेले राष्ट्रसंत आचार्य १०८ तरूण सागरजी महाराज यांची गत ४० दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. २८ आॅगस्टपासून त्यांनी जल व अन्न त्याग सुरू केले होते. संबंधीत वैद्यकीय अधिकाºयांनी मुनींना मुनिवृत सोडण्याची विनंती केली मात्र त्यांनी देहाची काळजी न करता मरण स्वीकारले आणि जैन मुनिंने एकदा दिक्षा घेतल्यानंतर ते त्या परिस्थतून परत येत नाही हे त्यांनी सिद्ध करुन दिले. आज पार्श्वनाथ भवन येथे सकल जैन समाज व गुरु परिवार व चातुर्मास समितीच्या वतीने सर्वधर्मिय श्रद्धांजली चा कार्यक्रम महामनाचार्य कुशाग्रनंदिजी गुरुदेव व भट्टारक स्वामीजी अरिहंत महर्षी यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जैन, अजैन भक्तांनी मुनिंच्या जुन्या आठवनींना उजाळा दिला. भगवान महाविर स्वामींची खरी ओळख त्यांच्यामुळेच जगाला झाली. त्यांनी भगवान महाविरांना मंदिरात जखडून न ठेवता त्यांना सर्वत्र पोहचविले. त्यांच्या अकाली जान्याने सकल जैन समाजासह त्यांना चाहणाºया अजैन मंडळींचे मोठे नुकसान झाल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौ. सुनिता शिंदे, डॉ. रामप्रसाद शेळके, डॉ. गणश मांटे, डॉ. इकबाल कोटकर, स्मिता अक्करबोटे, प्रमोद महाजन, अनिल सावजी, उदय छाजेड, संजय डोणगावकर, छबुराव भावसार, तुकाराम खांडेभराड, डॉ. शंकर तलबे, सचिन धन्नावत, नरेंद्र पुजारी, मुकेश सिंगलकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सौ. दिपाली खडकपूरकर यांनी मंगलाचरण घेतले तर अ‍ॅड. किशोर खवडे यांनी सूत्रसंचालन केले.
.................................................................................................................................
 समाजाचा दिशादर्शक हरवला : अशोक कोटेचा
 देऊळगावमही : (गजानन चोपडे) जैन धर्मियांनाच नव्हे तर धर्माबद्दल श्रद्धा असणाºया प्रत्येकासाठी आदरणीय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मुनी तरुण सागर महाराज आहेत. समाजातील अनिष्ट रुढी - परंपरांवर परखड शब्दांमध्ये त्यांनी सातत्याने प्रहार केला. १ सप्टेंबर रोजी त्यांच निधन झालं. त्यामुळे समाजाला दिशा देणारा दर्शक हरवला असल्याचं मत अंबिका अर्बनचे संचालक अशोक कोटेचा यांनी व्यक्त केले.
     येथे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र डुंगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देऊळगाव अर्बनचे अध्यक्ष रवींद्र जैन, सुरेश कोटेचा, पारसमल कोठारी, सुरेश कोठारी, सुनील कोटेचा, राजेंद्र कोटेचा, पवन कोटेचा, प्रकाश साकला यांच्यासह समाजबांधव, महिलांची उपस्थिती होती. महाराजांनी दिलेल्या शिकवणीनुसार संप्रदायीक वाद, गट, शाखा न ठेवता जैन म्हणून रहावे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे मत रवींद्र कोटेचा यांनी व्यक्त केले. सुनील कोटेचा यांनी देखील भावना व्यक्त केल्या. शेवटी नवकार मंत्र व शांती जप करून श्रद्धांजली अर्पण केली..

.


No comments:

Post a Comment