Monday, September 3, 2018

जागतिक युवा सप्ताहा निमित्त आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न


देऊळगावराजा : (प्रतिनिधी) स्थानिक महात्मा फुले कृषि तंत्र निकेतन येथे जागतिक युवा दिन व सप्ताहानिमित्त ग्रामीण रुग्णालय यांच्या आयसीटीसी विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना एच.आय.व्हि एडस व टि.बी या विषयावर आरोग्य विषयक कार्यक्रम घेण्यात आला.
     या क्रायक्रामचे अध्यक्ष स्थानी कृषि तंत्रनिकेतनचे प्रा.एस.ए.जाधव हे होते. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दि.१२ आॅगस्ट रोजी युवा दिन व युवासप्ताहा बद्दल माहिती देवून एच.आय.व्हि, एडस, टि.बी.एआरटी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थ्यांचे एच.आय.व्हि तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय चे आयसीटीसी विभगाचे समुपदेशक पी.एन.खरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी.एस.राठोड, कर्मचारी आर.के.अवचार, कु.ए.एन.इंगळे, के.व्हि.दसरे, ए.आर.गवाई, एस.जी.तायडे, वाय.आर.सांगवी, एस.बी.मापारी, के.एस.चव्हाण, व्हि.आर.तायडे, सौ.पी.एस.तिडके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.जी.खंडागळे यांनी केले तर आभार एस.एस.चव्हाण यांनी व्यक्त केले.  

No comments:

Post a Comment