Tuesday, September 4, 2018

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात

देऊळगावराजा : (प्रतिनिधी) श्रावण महिन्यात वद्य अष्टमीच्या तिथीवर मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृ ष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हीच प्रथा कायम राखत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहिहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
          श्रावण महिन्यात वद्य अष्टमीच्या तिथीवर मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृ ष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हीच प्रथा कायम राखत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहिहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 
यानिमित्त शाळेत गोपालकाल्याचा प्रसाद तयार करण्यात आला. या काल्याचा सर्वांनी आनंद घेतला. गोविंदा आला रे आला, हाथी, घोडा पालखी जय कन्हैया लाल की या जयघोषात उंच मडके दही, दुधाने भरलेले ठेऊन मानवी मनोरे तयार करुन विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा मिनल शेळके, सचिव डॉ. रामप्रसाद शेळके, प्राचार्य सत्यकुमार जिगे, लक्ष्मी देशभ्रतार, मनिषा नायडु यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. .

No comments:

Post a Comment