Tuesday, September 4, 2018

मातृतीर्थ मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाला खिंडार

सिंदखेडराजा माजी नगराध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश 
निवडणुकीच्या हालचालींनावेग 
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा आणि सिंदखेडराजा पालिकेच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर मातृतीर्थ मतदार संघात राजकीय हालचालंनी वेग घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंदखेडराजाच्या माजी नगराध्यक्षा सुदंराबाई जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्याण पुढील वर्षी लोकसभा, विधानसभा आणि सिंदखेडराजा पालिकेच्या निवडणुक होत असल्यानी राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडलेली आहे.
           दि.२५ मार्च २०१९ रोजी सिंदखेडराजा पालिकेचा पाच वर्षाचा कालावधी संपत आहे. त्यात लोकसभा, विधानसभेचेही वेध आता सर्वत्र लागलेले आहेत. या पृष्ठभूमिवर नगराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश महत्वपूर्ण ठरत आहे.
                 राष्ट्रवादी पक्षाचा मतदार संघात दबदबा कमी...  
          मागील २० वर्षाचा माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची एक हाती सत्ता व दबदबा होता. तसेच सर्व सामन्यांचे लोकप्रिय नेतृत्व असतांना मतदार संघात गेल्या सहा महिन्यापासून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेत आहे. त्यामुळे मातृतीर्थ मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचा दबदबा कमी होतांना दिसून येत आहे.   

         

No comments:

Post a Comment