Tuesday, September 4, 2018

डिग्रस बु. सचीवाच्या अतीरीक्त प्रभाराने गावकरी त्रस्त


डिग्रस बु.गावकर्यानी दिला आंदोलनाचा इशारा

देऊळगावराजा : तालुक्यातील डिग्रस बु. येथील सचिव यांना सावंगी टेकाळे या गावाचा अतरिक्त प्रभार देण्यात आल्याने ग्रामपंचायत स्तरातील कामे होत नसल्याने सचिवचा अतरिक्त प्रभार काढण्यात यावे या मागनीचा निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आला तसेच येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
      राज्य शासन प्रत्येक ग्रामपंचायात हायटेक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच शेतकऱ्यांना, विद्याथीँ व ग्रामपंचायात स्तरातील होणारे कामात कोणतीही अड़चन येऊ नये यासाठी ऑनलाइन ची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधा चा लाभ घेण्या साठी सचिव कायम स्वरूपी हजर पाहिजे पण डिग्रस बु. येथील सचिव लता अरबड़े यांना सावंगी टेकाळे या गावाचा अतरिक्त प्रभार देण्यात आल्याने डिग्रस बु. ग्रामपंचायात स्तरावरील कामे रखड़त आहे. शेतकऱ्यांना, विद्याथाँना व ग्रामस्थाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डिग्रस बु. येथील सचिवचा अतीरिक्त प्रभार काढण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत उप सरपंच सह सदस्यानी गटविकास अधिकारी यांना निवेदन मधे दिला आहे. या निवेदनावर उपसरपंच सौ.छाया टेकाळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पऱ्हाड़, बाबूलाल वाळ, विष्णु दूंडियार, सौ.मीरा गावड़े,सौ. रेखा पऱ्हाड़ यांच्या स्वाक्ष्ररे आहे.

       .

1 comment: