महसूल प्रशासनाच्या थातुमातूर कारवाईत दूजाभाव
तालुक्यात रेती माफीयाच्या धुमाकुळाने नागरिक भयभित
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असतानाच देऊळगावराजा तालुक्यातील रेती घाटांवर अवैध उत्खनन होत असल्याची बाब समोर आली आहे. तालुक्यातील रेती माफियांकडून राज्य सरकारच्या नियमावलीला तिलांजली दिली असल्याची बाब समोर येत आहे. मात्र महसूल अधिकाºयांची चुप्पी असल्याने तिव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दि.१३ जानेवारी २०१८ च्या निर्णयानुसार रेतीचे उत्खनन करताना घाटावर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश आहेत. या सीसीटीव्हीचा अहवाल दररोज अधिकाºयांना देणे बंधनकारक असताना या परिसरात कुठेच सीसीटीव्ह कॅमेरे आढळून येत नाहीत. माफिया कॅमेºयाची नजर चुकवित रेतीचे उत्खनन करीत आहेत. सोबतच रेती घाटांमध्ये मनुष्यबळाचा वापर करून रेतीचे उत्खनन करावे आणि रेती ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक करावी, असेही निर्देश आहेत. मात्र हे एकही नियम तालुक्यात घाटांमध्ये आढळत नाहीत. हीच संधी साधून घाटांवर अवैध रेती उपसा सुरूच आहे. तालुक्यातील ४ रेतीघाट आहे त्यात निमगावगुरु, देऊळगावमही, नारायणखेड, डिग्रस बु. ३ रेती घाटाची निलामी झालेली नसतांना विना परवानगी मोठ्या प्रमाणात यंत्राच्या सहाय्याने उपसा सुरू असल्याचे दिसून येते. जेसीबी आणि पोकलेनडच्या सहाय्याने येथे रेती उत्खन्नाचे काम होत आहे. अहोरात्र हा रेती उपसा दररोज या परिसरातील नागरिकांना येथे पहायला मिळतो. साºयांनाच ही वस्तुस्थिती ठावूक असतानाही कारवाई होत नसल्याने महसूल विभागाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, शासनाच्या नियमानुसार रेती घाटांवर वाहतूक आणि उत्खनना बाबत सर्व सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. वाळू घाटांवर यंत्राचा उपयोग न करता मनुष्यबळाच्या सहाय्याने उत्खनन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मिळालेली आहे. महसूल विभाग व पोलिसांनी कितीही धाडी टाकल्या तरी तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रात चालणारा अवैध रेती उपसा सुरूच असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. नदीतील अवैध रेती उत्खनना बाबत असंख्य तक्रारी दाखल झालेले आहेत परंतु आज रोजीही महसूल विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. तर थातूरमातूर कारवाईने दूजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे. नदीपात्रातील रेती उपसा केल्याने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे त्यावर बंदी आहे. तरी या भागात सर्रास उपसा सुरू असतो. रेती घाटावर परवानगी नसताना उपसा केला जातो. तसेच कारवाईत महसूल अधिकाºयांनवर रेती माफीयांकडून प्राणघातक हल्ले होतात याच कारणाने महसूल प्रशासनाच्या वतीने रेती माफीयांवर लागम कसण्याची गरज आहे. तर तालुक्यात रेती माफीयाच्या धुमाकुळाने नागरिक भयभित झालेले आहे.


उशीर केला बातमी द्यायला 😅😅
ReplyDelete