Tuesday, September 18, 2018

व्यंकटेश महाविद्यालयाला स्वच्छ भारत, स्वस्थ भारत पुरस्कार.

देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
         येथील व्यंकटेश महाविद्यालयाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाचा २०१७-१८ चा जिल्हास्तरीय स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान पुरस्कार प्राप्त झाला. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.यु.काळे व क्षेत्रीय समन्वयक डॉ. व्हि.आर.बन्सिले यांनी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते व संचालक डॉ. प्रशांत शिंगवकर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र या स्वरुपात पुरस्कार स्वीकारला. .
विद्यापिठाने ठरवून दिलेल्या स्वच्छ भारत स्वस्थ भारत या मोहिमे अंतर्गत महाविद्यालय परीसर, देऊळगाव राजा शहर, दत्तकग्राममध्ये स्वच्छता मोहिम व विविध उपक्रम राबविले. यामध्ये नालेे सफाई, कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन, हागणदरीमुक्त गाव, जनजागृती, पथनाटय आदि कार्र्यक्रम राबविले. प्राचार्य गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने याआधी विद्यापीठाचा दोनवेळा स्वच्छ भारत अभियान पुरस्कार, उत्कृष्ट कार्यक्रम पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळविले तसेच महाराष्ट्र शासनाचा जागर जाणिवांचा अभियान हा पुरस्कारही सलग दोन वेळा मिळविला आहे..

No comments:

Post a Comment