Thursday, September 20, 2018

देऊळगाव मही येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार


कर्मचा-यासह रूग्णावर अरेरावी....
 देऊळगाव मही : (रंजीत खिल्लारे)
       देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले ग्रामीण रूग्णालय देऊळगाव मही येथे राष्ट्रीय महामार्गावर आहे या रूग्णालयाला तिस ते पस्तीस खेडे जोडलेले आहेत या सर्व गावामधून रूग्ण येथे ऊपचारासाठी येत असतात. येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डाॅ .सोळंकी यांच्या मनमानी कारभारा मुळे रुग्ण त्रस्त झाल्याची करार गावकरयानी केली आहे.
        देऊळगांव मही तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिक येथे कामा निमित्त येत असतात तसेच या परिसरात रुग्णना उपचारा साठी  ग्रामीण रूग्णालय उपलब्ध आहे. परंतु रुग्नणा येथे खूप खालच्या दर्जाची वागनूक देवून अपमान केल्या जात आहे येथील वैद्यकीय अधिक्षक डाॅ विशाल सोळंकी या वैद्यकीय अधिका-याने मनमानी कामाचा कळस गाठला असून कर्मचा-यासह रूग्णांना धारेवर धरत विनाकारन मानसिक त्रास देत आहेत... त्यांची डिवटी नसतांना विनाकारन दवाखाण्यात येने मूद्दाम कर्मचा-या सोबत वाद घालने असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून डाॅ.सोळंकी करीत आहे ..या सर्व प्रकाराला येथील कर्मचारी कंटाळले असून सर्व कर्मचारी आरोग्य संचालक अकोला यांना तक्रार करणार असून वैद्यकीय अधिकारी डाॅ .सोळंकी याच्या बदलीची मागणी करणार आहेत.. तसेच त्या अगोदर बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.पंडित हे या डाॅक्टरवर काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .... गावातिल नागरीक सुद्धा डाॅ.सोळंकी याच्या वागनूकीला कंटाळले असून अशा डाॅक्टरची तडकाफडकी बदली करा असे निवेदन आरोग्यमंत्री यांना देणार असल्याचे गावक-याच्या वतिने सांगण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment