देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
तालुक्यात ४ रेती घाट असून सध्या स्थितीत डिग्रस येथील रेती घाट सुरु आहे. तरही तिन ठिकाणावरून अवैध रेती उपसा जोरात असल्याने दि.२४ सप्टेंबर रोजी निमगाव गुरु येथील तलाठी गजानन दराडे वाहनांची तपासणी करीत असतांना त्यांच्यावर टिप्पर चालकांनी मारहान केल्याची घटना घडली असून तलाठी संघटने कडून आरोपी तात्काळ अटक करण्याची मागणीचा निवेदन तहसीलदाला देण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात अवैध रित्या रेती खडकपूर्णा पात्रात रेती उपसा सुरु आहे. त्या अनुषंगाने रेती माफीयांवर कारवाई करण्यासाठी तलाठी दराडे यांनी रेती वाहतुक करणाºया टिप्पर क्र.एच १४ बिजे १५८४ या वाहनाचे पंचनामा करतांना वाहन मालक सचिन चित्ते चालक विनोद दहेकर व इतर १० ते १२ इसमांनी तलाठी दराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन वाहन पळून नेले तर भविष्यात पुन्हा रेती प्रकरणात कारवाईस याल तर हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटने बाबत स्थानिक पोलिस स्टेश्न येथे विविध कलमानूसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रेती माफीयांच्या धाकाने महसूल विभाग प्रचंड तनावात आहे. सदर आरोपीवर तात्काळ अटक करावी तसेच लेखी निवेदन देवून शासकीय कामावर बहिष्कार टाकण्यात आला. याप्रसंगी तलाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


डिग्रस बु येथून रेती कुठून पण जात नाही.
ReplyDeleteNice job ashraf bhai
ReplyDelete