देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
भाजपच्या वैद्यकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. सुनील कायंदे यांची निवड करण्यात आली आहे. .
डॉ. सुनील कायंदे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघात आपल्या कार्यकतृर्त्वाची छाप पाडली आहे. पक्षाचे कुठलेही पद नसताना नवचैतन्य निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, सरचिटणीस अ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. रामदास आमटकर, धृपदराव सावळे व प्रशांत राठोड यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमराज राठी यांनी डॉ. कायंदे यांची निवड केली आहे. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कायंदे यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. गाव तेथे शाखा, घर तेथे कार्यकर्ते निर्माण करणार असल्याचे ते म्हणाले..


No comments:
Post a Comment