Monday, October 1, 2018

महिला आघाडी संपर्कप्रमुख साधणार संवाद

देऊळगाव राजा : (प्रतिनिधी).
        आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी महिला आघाडी संपर्कप्रमुख वंदना तोडणकर उद्या १ व २ ऑक्टोबर असे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. .
        घाटाखालील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी शेगाव येथे संवाद साधला जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबरला मेहकर येथे घाटावरील महिला शिवसैनिकांची बैठक घेण्यात येणार आहे. महिला शिवसैनिक व शिवसेनेत काम करू इच्छीणाऱ्या महिला कार्यकर्त्यांशी तोडणकर चर्चा करतील. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा महिला आघाडी संघटक शीलाताई शिंपणे यांनी केले आहे.. .

No comments:

Post a Comment