देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू, एकनिष्ठ वीररत्न जीवाजी महाले यांची जयंती नाभिक महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी नाभिक संघटना आणि जीवाजी महाले युवासेना या माध्यमातून व्याख्यान, मिरवणूक, आयोजित करण्यात आले आहे.
दरवर्षी जीवाजी महाले यांची जयंती साजरी केली जाते. परंतु यावर्षी नाभिक नविन कार्याकारणी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे जयंती उत्सव जोरदार साजरी करण्यात येणार आहे. याशिवाय जयंतीदिनाच्या औचित्य साधून कार्यक्रम आणि भव्य मिरवणूकही काढली जाणार आहे. नाभिक संघटना आणि जीवाजी महाले युवासेना हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहे. सलग दोन दिवसापासून जयंती उत्सवाची तयारी करण्यासाठी राहणार दि ८ आणि ९ आॅक्टोंबर २०१८, असे दोन दिवस देऊळगाव राजा शहरासह परिक्षेत्रातील हेअर सलून बंद ठेवावे तसेच सदर कार्यक्रमांमध्ये कुटूंबासह सहभाग दर्शवावा, असे आवाहन नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल शेजुळकर यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment