Tuesday, October 9, 2018

जीवाजी महालाने आपले नाव इतिहासात अमर केले : नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे

 
 जीवाजी महाले जयंती उत्साहात साजरी     
 देऊळगाव राजा : (प्रतिनिधी) 
        शिवरायांचे मराठी स्वराज्य आकारण्यास अनेक हिºयाचिºयांचे योगदान लाभले. अनेक संकटात राजांना त्यांच्या मावळ्यांनी प्राणार्पण देऊन सहिसलामत बाहेर काढले. अफजलखानाच्या भयंकर आक्रमणातून शिवरायांचे प्राण वाचवून जीवाजी महालाने आपले नाव इतिहासात अमर केले, असे विचार नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे व्यक्त केले. 
         
            दि.९ आॅक्टोंबर रोजी मिरवणूक व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्­वासू, एकनिष्ठ वीररत्न जीवाजी महाले यांची जयंती नाभिक महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात दि.आॅक्टोंबर रोजी  साजरी करण्यात आली. नाभिक संघटना आणि जीवाजी महाले युवासेना या माध्यमातून व्याख्यान, मिरवणूक, तसेच अनेक उपक्रम राबविण्यात आले. दरवर्षी प्रमाणे जीवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती सौ.कल्याणी शिंगणे, नगरसेविका विमलबाई माळोदे, सौ.शारदा जायभाये, सौ.दिपमाला गोमधरे, राजु सिरसाठ, बद्री बैरागी, गणेश सवडे, प्रभाकर वखरे, डॉ.सुजित काळे, बबनराव जाधव, मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, राजेश इंगळे, प्रकाश साकला तसेच तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना सौ.शिंदे म्हणाल्या की, शिवाजीने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर  अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाजी ने शिवाजीराजांचे प्राण वाचले. जो पर्यंत इतिहास जिवंत आहे तो पर्यंत जिवाजी महाले यांचा नाव सुवर्ण अक्षरात लिहण्यात आलेला आहे. याप्रसंगी नाभिक संघटनेची नविन कार्याकारणी पदाधिकारी व सदस्यांचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात शिवाजी महाराज़, जिवाजी महाले यांची वेशभुषा धारण करुन मुलांनी सर्वाचे मने जिंकली. मातृतीर्थ मतदार संघातून मोटर सायकल रॅली काढून नाभिक समाजाच्या वतीने आगळावेगळा संदेश दिला. मिरवणूक सकाळी ११ वाजता काढण्यात आली प्रथम जुनी नगर पालिका चौक, खुट पार्इंट, संतोष चित्र मंदीर चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान बाबा चौक ते संत सेनाजी महाराज सभागृह येथे समापन करण्यात आले. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नाभिक संघटना आणि जीवाजी महाले युवासेना हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी तालुकाध्यक्ष सुनिल शेजुळकर, कैलास राऊत, गणेश निबांळकर, धनजय मोहिते, रामदास पंडीत, संदेश वाघ, विजय जाधव, राजेश पंडीत, विलास मोहिते, ज्ञानेश्वर वाघ, पाडुरंग बोरकर, सचिन मोहिते, गणेश भुतेकर, अनिल वरपे, मधुकर वरपे, संतोष पंडीत, गजानन निबांळकर, निलेश मोहिते, विठ्ठल निंबाळकर, दिलीप शेजुळकर, सुधाकर वरपे आदीनी विशेष परिश्रम घेतले. दोन दिवस देऊळगाव राजा शहरासह परिक्षेत्रातील हेअर सलून बंद ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप राऊत, व आभार नाभिक संधटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल शेजुळकर यांनी व्यक्त केले. यावेळी मातृतीर्थ मतदार संघातील नाभिक समाजाचे नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


 


       

1 comment: