शास्त्री महाराजांवर पत्रकार परिषदेत घणघणाती आरोप
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
संत भगवान बाबा राष्ट्रसंत होते त्यांनी आपल्या कीर्तनाच्च्या माध्यमातून अठरा पगड जातीच्या लोकांना शिक्षणाचा संदेश देत समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले. दसरा मेळाव्याची परंपरा ३६ वर्षाची आहे. या महान संताच्या पवित्र भगवान गडावर मध्यनंतरी राजकीय खेळी खेळून ही दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचा कट मागील तीन वर्षा पासून नामदेव शास्त्री महाराज करीत आहे. त्यांची राजकीय मनोकामना पूर्ण झाली नाही म्हणून दसरा मेळाव्याला विरोध करीत आहे. असा घणघणाती आरोप माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
स्थानिक सरूचि हॉटेल च्या प्रागणात दि.१० आॅक्टोबर रोजी दसरा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपा नेते डॉ. गणेश मांटे, प्रभाकर ताठे, विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे आदि उपस्थित होते. माजी आमदार केंद्रे म्हणाले की , लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी ऊसतोड़ कामगार आणि अठरा पगड़ जातीच्या लोकांसाठी दसरा मेळाव्याची सुरुवात केली. नामदेव शास्त्री महाराजांना भगवान गडावर गादी वर बसविणारे स्व.गोपीनाथ मुंडे होते. त्यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची ३६ वर्षाची परंपरा खंडित करण्याचे काम नामदेव शास्त्री महाराज करीत आहे. मागील वर्षी दसरा मेळावा भगवान बाबा यांच्या जन्म गावी घेण्याचा निर्णय ना.पंकजा मुंडे यांनी घेतला आणि या वर्षी ही लाखोच्या संख्येत नागरिकानी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी भगवान बाबांचे भव्य स्मारकाचे लोकापर्ण सोहळा होणार आहे. बाबांच्या स्माराक लोकसहभागातून व्हावे तर कोणाच्या एकट्याच्या मालकीची नसून अठरा पगड जातीचे आहे अशी भावना ना.पंकाजा मुंडे यांनी व्यक्त केली अशी माहिती उपस्थितांना दिली. मातृतीर्थ सिंदखेडराजा जिजामातेच्या पुण्य भुमितील माती देखील पवित्र कलशात भगवान बाबांच्या जन्म गावी सावरगाव घाट येथे घेवून जाणार आहे अशी घोषणा डॉ.सुनील कायंदे यानी केली. यावेळी दसरा कृती समितीचे सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.



No comments:
Post a Comment