नवरात्र उत्सव काळात नऊ तास भारनियमन
देऊळगाव मही - (प्रतिनिधी)
चार महिन्यापासुन पावसाने उघाड दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असुन अनेक लघु मध्यम तसेच अनेक प्रकल्पात पाण्याचा खणखणाट आहे एकीकडे पावसाने उघाड दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्याबरोबर दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन कोळशाच्या तुडवडा तसेच महाराष्ट्रातील अनेक संच पाण्याअभावी बंद पडले असुन भारनियम सर्वत्र सुरू आहे मात्र गावठाण परिसरातील नऊ तासाचे भारनियमन नवरात्र उत्सव काळात कमी करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने वीज वितरण कंपनीचे अधिकारी प्रफुल्ल चितोडे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
एकीकडे असंख्य दुर्गा उत्सव मंडळाने दुष्काळजन्य परिस्थिती असूनही मंडप सजावट तसेच रोषणाई वर खर्च केला असुन नऊ तास गावठाण परिसात भारनियमन सुरू केल्याने दुर्गा मातेच्या भक्ताची निराशा केली वीज वितरण कंपनीकडे विजेचा तुटवडा लक्षात घेऊन सध्याकाळाचे भारनियमन बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस केली आहे या वेळी राष्ट्रवादी जिल्हा युवक कार्याध्यक्ष समाधान भिकाजी शिंगणे , राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रवींद्र इंगळे ,शेख सईद , निकेश भागीले , बळीराम शिंगणे , विकास शिंगणे सुभाष शिंगणे मंगेश होमपारखे , किरण शेळके अमान शेख , गजानन म्हस्के , गोपाळ पाबळे , किशोर सोळंकी , दशरथ शिंगणे , ज्ञानेश्वर गायकवाड ,चव्हाण इत्यादी युवक काँग्रेस चे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment