Wednesday, October 10, 2018

नवरात्र उत्सव काळात नऊ तास भारनियमन बंद करा, अन्यथा आंदोलन


अच्छे दिन बरोबर, अच्छा रात्रींना सुरुवात..!
 देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)           
         चार महिन्यापासुन पावसाने उघाड दिल्याने  संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असुन अनेक लघु मध्यम तसेच अनेक प्रकल्पात पाण्याचा खणखणाट आहे एकीकडे पावसाने उघाड दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्याबरोबर दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन कोळशाच्या तुडवडा तसेच महाराष्ट्रातील अनेक संच पाण्याअभावी बंद पडले असुन भारनियम सर्वत्र सुरू आहे. मात्र  गावठाण परिसरातील नऊ तासाचे भारनियमन नवरात्र उत्सव काळात कमी करावे अशी मागणी स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अधिकारी खाली खूर्चीला निवेदन देऊन केली आहे. मागणी त्वरीत मान्य झाल्यास दि. १६. १०. २०१८ रोजी ठिय्या आणि शिट्टी बजाव आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.
          एकीकडे असंख्य दुर्गा उत्सव मंडळाने दुष्काळजन्य परिस्थिती असूनही मंडप सजावट तसेच रोषणाई वर खर्च केला असुन तसेच नऊ तास गावठाण परिसात भारनियमन सुरू केल्याने हेच का अच्छे दिन म्हणून भाजपा सरकारची, ग्रामिण भागातील जनतेला विद्युत भरनियमनाची भेट  देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गावठाण फिडरवर सकाळी ५ ते ९ व रात्री ७ ते १० वाजे पर्यंत भारनियमन करतात तसेच दिवसभर शेतात राबल्या नंतर, सायंकाळी घरगुती कामे करतांना माय - बहिणींनीना अडचण निर्माण होत आहे. ऐन परीक्षेच्या दिवसामध्ये विद्यार्थी अभ्यासापासून वंचीत, डासांच्या चावण्यामुळे वृध्द व मुलांच्या आरोग्यावर परिणाम, विविध आजारांचे प्रमाण वाढले, रात्रीचे व सकाळचे भारनियमन  तात्काळ बंद करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा उप कार्यकारी अभियंता, देऊळगांव राजा यांचे कार्यालयात कोणताही जवाबदार अधिकारी नसल्याने. उप कार्यकारी अभियंता यांचे रिकाम्या खुर्चीस हार घालून व चिटकवून दिले निवेदन. भारनियमन बंद करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतिष मोरे आदि स्वभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
                           

No comments:

Post a Comment