Monday, October 8, 2018

अखेर... वळण रस्त्याचा श्वास मोकळा

     
 बागवान कॉलोनीत  वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल विभाग आणि पोलिसांनी पुढाकार
  देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
        नागपूर पूणे महामार्गा वरील बागवान कॉलोनीत  वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल विभाग आणि पोलिसांनी पुढाकार घेत दि.८ आॅक्टोंबर रविवारी  विशेष मोहिम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ९ अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून अडकलेला महामागार्चा श्वास मोकळा झाला आहे. 


        श्री बालाजी महाराजांच्या पुण्नगरीत पंचतारांकित औद्योगिक वसाहत, त्यात येऊ घातलेल्या एमआयडीसीमुळे तसेच शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असल्यामुळे परिसराचे महत्त्व वाढले आहे. शहरातून जाणारा नागपूर पुणे महामार्गाला वाहातुकीचा अडथळा निर्माण होत असल्यानी शहरासाठी वळण रसत्याच्या कामाला मुजंरात मिळाली नागपूर पूणे महामार्ग वर्दळीचा रस्ता झालेला आहे. विदर्भासह व मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना जोडण्याचे काम हा महामार्ग करतो. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे रस्त्यावरील हे अतिक्रमण, दुकाने, पानटपºया, घरे आदींना हटविण्याची मोहीम महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार दिपक बाजड, नायब तहसीलदार मदन जाधव आणि कर्मचारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी भिमानंद नलावडे, ठाणेदार सारंग नवलकार, सिंदखेडराजा ठाणेदार बळीराम गिते व पोलिस कर्मचारी यांनी हाती घेतली आहे. वळण रसत्याच्या हद्दीतील रस्त्यालगत अतिक्रमणे काढली तर सोमवार सकाळ पासून २२० मिटर वळण रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार अवघ्या १५ दिवसात वळण रस्ता वाहातूकीसाठी खूला होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या  वळण रस्त्याचा श्वास मोकळा झाला.  सायंकाळपर्यंत सुमारे ९ अतिक्रमणे, यात प्रामुख्याने पत्र्यांचे शेड, घरे, उभारलेले कच्चे बांधकाम आदी हटविण्यात आले. कारवाईपूर्वी संबंधित जागा मालकांना नोटीसही देण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई सुरू करताच बहुतांश जागामालकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. कारवाईमुळे या रस्त्याचा श्वास मोकळा होण्यास मदत झाली. 



            वाहातुकीसाठी महत्वाचा मार्ग
      हा अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. अनेक जागा मालकांनी ठिकठिकाणी अतिक्रमणे केली, काही ठिकाणी रसत्याच्या मध्यभागी असलेल्या अतिक्रमाणांमुळे वाहतुकीला अडथळा होत होता, अपघात होत होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात येत आहे.  
                                            दिपक बाजड, तहसीलदार देऊळगाव राजा
      
    १५ दिवसात विद्यार्थ्यांना  मिळणार मोकळा रस्ता 
           अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे राज्य महामार्गवळण रस्त्याच्या दुतर्फा मोकळा श्वास घेवू लागल्याने शहरातून जाणाºया मार्गावरून जाणारे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींनीसह शालेय व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनाही ऐसपैस जागा मिळाल्याने त्यांच्या चेहºयावर समाधानाचे वातावरण होते. अनेक पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाताना येथून जीव मुठीत घेवूनच ये-जा करावी लागत होती. या पालकांनी महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले.
                 

     

No comments:

Post a Comment