Monday, October 15, 2018

तालुक्यात असंख्य गावात पंधरा ते एक महिन्या आड होतो पाणी पुरवठा


 विहिरी , तलाव आटले  धरणात केवळ ३४ % मृत साठा  
 देऊळगावमही : (गजानन चोपडे)
           बुलडाणा जिल्हात सर्वात मोठा प्रकल्प देऊळगावराजा तालुक्यातील संत चोखा सागर धरणाची ओळख हा प्रकल्प ५.५ टीएमसी क्षमतेचा असुन १६० दशलक्षघनमीटर लांबीचा आहे मात्र या वर्षी पाण्याने चार महिन्यापासून उघाड दिल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने देऊळगावराजा तालुक्यात ६० गावात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भभवणार असून संबंधित प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज भासत आहे . 
          धरण उशाला कोरड घशाला अशी सर्वसामान्य नागरिकांची गत  संत चोखा सागर धरणातून तालुक्यासह जिल्हातील विविध भागात पाणीपुरवठा केल्या जातो मात्र या वर्षी हवामान खात्याचे अंदाज चुकल्यामुळे पावसाने चार महिन्यापासुन हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले त्यामुळे गुरांच्या चारा प्रश्न गंभीर बनला असून लघु, मध्यम , तसेच विहिरी, आटल्या असुन पिण्याचा पाण्याचा तसेच शेती पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे तसेच  संत चोखा सागर धरणाच्या पाण्यावर तालुक्यासह जिल्ह्याची मदार मात्र या वर्षी केवळ धरणात ३४ टक्के मृत साठा असल्यामुळे येणाºया काळात भीषण दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे तसेच खडकपूर्णा नदी पात्रात पाण्याचा खणखणाट असुन नदी काटच्या गावांना पाण्याचा प्रश्न उदभवणार असुन  संबंधीतीत विभागाने या कडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी समस्त नागरिकाडून होत आहे.
     

            तालुक्याती जलस्त्रोत कोरडे
 सावखेड भोई -०.०० दलघमी, अंढेरा -०.६२ दलघमी, मेंडगाव- ०.२७ दलघमी 
पिपळगाव चिलमखा ०.०० दलघमी, शिवनी आरमाळ - ०.०० दलघमी  
     जलसाठे कोरडे पडल्यामुळे जनावराच्या पिण्याच्या प्रश्न बिकट  
    पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन लघू मध्यम तसेच विहिरी आटल्यामुळे जनावरांच्या पाणी प्रश्न बिकट होत चालला आहे.
                                                 पुरुषोत्तम विनायक  पाटील डीग्रस 
           अनेक गावांत पाण्याच्या भीषण प्रश्न 
          लघु मध्यम तसेच विहिरी आटल्या असुन शेती चा तसेच पिण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन येणाºया काळात पाऊस न पडल्यास गंभीर पाणी समस्या उदभवणार आहे संबंधित प्रशासने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
                                                         स्वप्निल शिंदे, पाडळी शिंदे
              पंधरा दिवसांआड नळाला येते पाणी - 
        देऊळगावमही ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत असून पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे संबंधित प्रशासने दुष्काळाची दाहकता लक्षात घेता उपाययोजना करणे आवश्यक आहे.
                                रंजित खिल्लारे, देऊळगावमही
              दूषित पाण्यामुळे वाढले आजार 
          दिवसेंदिवस पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला असुन नागरिकांना विविध ठिकाणाहून दूषित पाणी आणावे लागत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यामुळे विविध आजार वाढत आहे त्यामुळे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
                                                              संतोष सानप, मंडपगाव 
      


          वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाण्याची पातळी गेली खोल 
एकीकडे वाळूच्याबेसुमार उपशामुळे खडकपूर्णा नदी पत्रातील पाणी दिवसेंदिवस खोल गेले असुन खडकपूर्णा नदी चा वाळवंट झाला आहे त्यामुळे या वर्षी नदी काठच्या गावांना भीषण पाणी टंचाई भेडसावणार आहे तसेच संत चोखा सागर धरणात केवळ ३४.७ एवढा मृत साठा शिल्लक असंख्य गावाची या धरणावर पिण्याच्या पाण्याची  मदार असून संबधित विभागाने भेडसावनारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment