मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
चिखली : तंज़ीम शेख
ग्रामीण तसेच शहरी भागातील विधीसेवा देवून कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निकाल लावण्याकरिता तसेच विविध तंटे, वाद इ. बाबींचा निपटारा करून विधीविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने फिरत्या विधीविषयक मोबाईल व्हॅनचे चिखली कोर्टात आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. याबाबत असे की, दि.२० रोजी चिखली दिवाणी व फौजदारी न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई अंतर्गत फिरते विधी सेवा प्राधिकरण व लोकअदालतीच्या फिरत्या मोबाईल व्हॅनचे आगमन झाले. यावेळी चिखली न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सचिन ठोंबरे, सहदिवाणी न्यायाधीश एल.एच.जाधव मॅडम, माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेच चिखली वकील संघाचे अध्यक्ष अॅड.सलीम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सदर फिरत्या न्यायालयाच्या मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांसमवेत सर्वश्री अॅड.मंगेश व्यवहारे, एल.एच.बाहेकर, ए.टी.देशमुख, अरूण गवई, एस.बी.जाधव, सुनिल अवसरमोल, माळोदे, सहा. अधिक्षक ए.जे.ठेंग, जी.पी.वानखेडे, अजय नायडू, वरिष्ठ लिपीक दिपक पवार, मोबाईल व्हॅन चालक ए.एम.खान आदी उपस्थित होते.
चिखली तालुका क. स्तर न्यायाधीश सचिन ठोंबरे महणाले राज्यघटनेअंतर्गत सर्वांना समान न्यायाचे अभिवचन देण्यात आलेले आहे. जिल्हा विधी सेवा प्रधिकरणामार्फत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना कायदेविषयक सेवा-सुविधा पुरविण्यात येतात. फिरते विधी सेवा केंद्र व लोकन्यायालयाव्दारे विविध कायद्यातील तरतुदी कोणत्या आहेत याबाबतची माहिती सामान्य जनतेपर्यत पोहचविण्यात येणार आहे. लोकन्यायालयाअंतर्गत विविध प्रकरणे सलोख्याने व तडजोडीने सोडविण्यात येतात असेही श्री यांनी सांगितले. वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.सलीम शेख म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्रधिकरणामार्फत विविध कायदेविषयक माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात येते. पक्षकारांनी फिरते विधी सेवा केंद्र व लोकन्यायालय या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

No comments:
Post a Comment