देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
| सततची दुष्काळजन्य परिस्थिती, दुबार तिबार पेरणीचे संकट, अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान लक्षात घेऊन देऊळगावराजा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा अशी मागणी देऊळगावराजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना निवेदनाद्वारे केली. कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी देऊळगावराजा तालुक्यात विविध भागांची पीक पाहणी केली. यावेळी ना. खोत यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक जलसाठे कोरडे पडले व जनावरांच्या चारा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी सातत्याने अस्मानी तसेच सुलतानी संकटाचा सामना करत आहे. शासनाने देऊळगावराजा तालुक्याचे नाव वगळले असून दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेता दुष्काळग्रस्त यादीत नाव घेऊन देऊळगावराजा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा असे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी राजीव सिरसाठ, पं. स. सभापती कल्याणी शिंगणे, राजू चित्ते, सदाशिव मुंढे, गजु शिंगणे, गणेश बुरकुल, रवींद्र गिते, विकास चित्ते, रावसाहेब डोके, बळी शिंगणे, गजानन भागीले, प्रशांत सानप, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. |


No comments:
Post a Comment