Friday, November 2, 2018

शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे चुकारे जमा होण्यास सुरुवात

आ. डॉ. खेडेकरांच्या प्रयत्नांना यश
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी) 
       शासनाने तूर, हरबरा या कृषीमालाची हमी भावाने खरेदी केली परंतु काही तांत्रीक अडचणींमुळे सदर मालाचे चुकारे रखडले होते. यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले. ऐन दिवाळीसारख्या सणात आर्थिक संकट शेतकऱ्यासंमोर उभे राहिले होते. दरम्यान आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात तूर, हरबऱ्याची रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. १५९ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांच्याही खात्यात पैसे जमा होणार आहेत. .
     डॉ. खेडेकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्याने २१ सप्टेंबर रोजी मुंबईत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात बैठक झाली तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव शदिनेशकुमार जैन यांच्या दालनामध्ये सुध्दा बैठक झाली. यावेळी आ. डॉ. खेडेकर यांनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मांडत चुकारे तातडीने अदा करण्याची मागणी केली होती. त्याची दखल मुख्य सचिव दिनेशकुमार जैन नाफेडच्या दिल्लीतील यंत्रणेशी संपर्क साधून चुकारे अदा करण्याची विनंती केली. त्यानुसार नाफेडद्वारे संबंधित यंत्रणेस चुकारे अदा करण्याचे निर्देश देण्यात आले. पहिल्या टप्यात १९२४ क्विंटल तुरीचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित ११०० शेतकऱ्यांचे चुकारे देखील लवकरच जमा केले जाणार आहेत. .नाफेड केंद्राकडे १५ हजार ८०५ क्विंटल तुरीचे चुकारे बाकी होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १९२४ क्विंटल तुरीचे चुकारे १५९ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित ११०० शेतकऱ्यांच्या खायात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती नाफेडचे व्यवस्थापक पवन पवार यांनी दिली आहे. .आ. डॉ. खेडेकर यांच्या प्रयत्नांमुळे ऐन दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment