Thursday, October 11, 2018

नवरात्र उत्सव काळात ६ तास भारनियमन बंद करा : राष्ट्रवादी काँग्रेस


 भारनियमन बंद करण्याचे कार्यकारी अभियंताचे आश्वासन 
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
          पावसाने उघाड दिल्याने  संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असुन अनेक लघु मध्यम तसेच अनेक प्रकल्पात पाण्याचा खणखणाट आहे एकीकडे पावसाने उघाड दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याबरोबर दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन कोळशाच्या तुडवडा तसेच महाराष्ट्रातील अनेक संच पाण्याअभावी बंद पडले असुन भारनियम सर्वत्र सुरू आहे. बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत ६ तासाचे भारनियमन सुरु आहे. तसेच नवरात्र उत्सव बालाजी मंदीर परिसरात महिलांचे कार्यक्रम सुरु असतात त्यासाठी शहराच्या भारनियमन बंद करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गाडगे यांना निवेदन देऊन मागणी करताच बालाजी फरस भारनियमन मुक्त करण्याचे आश्वासन दिले. 
         एकीकडे असंख्य दुर्गा उत्सव मंडळाने दुष्काळजन्य परिस्थिती असूनही मंडप सजावट तसेच रोषणाई वर खर्च केला असुन शहरात ६ तास भारनियमन सुरू केल्याने  दुर्गा मातेच्या भक्ताची निराशा केली वीज वितरण कंपनीकडे विजेचा तुटवडा लक्षात  घेऊन शहरातील बालाजी फरस या भागातील भारनियमन बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन द्वारे केली आहे. बालाजी फरस भारनियमन मुक्त करण्याचे आश्वासन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गाडगे दिले. या वेळी पंचायत समिती उपसभापती हरीश शेटे, राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे, धनंजय मोहिते, अरविंद खांडेभराड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
               

       

No comments:

Post a Comment