Tuesday, October 23, 2018

शेतकऱ्यांना तुर व हरभरा पिकाचे चुकारे आठ दिवसात मिळणार !

शिवसेना लोकप्रतिनिधींचा पाठपूरावा                       
 देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
       शेतकºयांचे तूर, हरभºयाचे नाफेडकडे असलेले चुकारे दिवाळीपूर्वी देण्याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन मागणी केली असता येत्या आठ दिवसात दिवाळीपूर्वी तूर हरभºयाचे थकीत चुकारे करु असे आश्वासन यावेळी शासनातर्फे राज्याच्या मुख्य सचिवाने दिले.
     यावर्षों  शासनाने, हमी भावाने तूर व हरभरा खरेदी केली आहे. मात्र, तुरीचे व हरभºयाचे चुकारे काही तांत्रिक अडचणीमुळे अदा करण्यात आले नव्हते त्यामुळे शेतकरी अंत्यंत आर्थिक अडचणीत आला होता सदहु चुकारे लवकरात लवकर अदा करण्यात यावे यासाठी मा.खा.प्रतापराव जाधव, मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर व मा.आ.डॉ.संजय राममुलकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्यानुसार दि.२१ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथे मा.ना.सदाभाऊ खोत, कृषी राज्य मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या दालनात संबधीत सर्व अधिकारी यांच्या सोबत बैठक झाली. व त्याच दिवशी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्री दिनेशकुमार जैन यांच्या दालनामध्ये सुध्दा बैठक झाली व नंतर सर्व शासकीय यंत्रणा त्वरीत कार्यरत झाली.महाराष्ट्र शासनाने नाफेड,दिल्ली यांच्या शी संपर्क करुन सदहु चुकारे देण्याची विनंती केली. आज दि.२३ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथे मा.दिनेशकुमार जैन मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन यांच्या दालनात, मा.खा.प्रतापराव जाधव, मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर, मा.आ.डॉ.संजय रायमुलकर तसेच मा. जालिधंर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख, बुलडाणा यांच्या सोबत बैठक झाली असता आठ दिवसा च्या आत सदहु पिकाचे चुकारे शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा होतील असे आश्वासन मा.श्री दिनेशकुमार जैन, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी बैठकीत दिले. 
     
  तूर आणि हरभºयाचे चुकारे त्वरीत द्या 

              दि.२३ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथे मा.दिनेशकुमार जैन मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या दालनात शेतकºयां प्रत्येक वेळी तूर हरभºयाचे चुकारे वेळेवर होत नसल्याने शेतकºयांना अडचणी निर्माण होत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने येणाºया दिवाळीत सण उत्सव साजरा करण्यासाठी शेतकरी उदासिन झालेला आहे. त्यांची हीच परिस्थिती लक्षात घेवून सिदंखेडराजा मतदार संघाचे आमदार या नात््याने   बैठक घेवून दिवाळी पूर्वी आठ दिवसा च्या आत सदहु पिकाचे चुकारे शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा अशी चर्चा केली असता दिनेशकुमार जैन, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी आश्वासन दिले. 
                                  डॉ.शशिकांत खेडेकर, आमदार सिंदखेडराजा मतदार संघ

No comments:

Post a Comment