Thursday, October 11, 2018

डिग्रस रोड वरील जड वाहतूक झाली बंद

साप्ताहिक मातृतिर्थ एक्सप्रेसच्या  बातमी ची प्रशासने घेतली दखल 


देऊळगाव मही : (प्रतिनिधी)
          बुलडाणा जिल्हात रेती ची खान म्हणून डिग्रस गावाची ओळख खडकपूर्णा नदी ही गावाच्या जवळून गेली असल्यामुळे दरवर्षी या नदी वरील रेती घाट  लिलाव होत असतात मात्र संबंधित रेती व्यावसायिक प्रशासनाला न जुमानता रेती उपसा व वाहतुकी संदभार्तील सर्व नियम धाब्यावर बसवुन  मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत आहे तर दुसरीकडे डिग्रस रस्त्याची क्षमता नसतांनाही जड वाहतूक होत असल्यामुळे डिग्रस रस्त्याची चाळन होत असुन जड वाहनाच्या वाहतुकी मुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. तसेच या वाहतूकीमुळे डिग्रस रस्त्यावरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन या रस्त्यावरील जड वाहतुक बंद करावी अशी मागणी अनेक दिवसापासून नागरिक करत होते मात्र नागरिकांचे हित जोपासून साप्ताहिक मातृतिर्थ एक्सप्रेस ने जड वाहतुकीमुळे डिग्रस रस्त्याची चाळण या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली या वृत्ताची तात्काळ देऊळगावराजा चे  तहसीलदार  दीपक बाजड यांनी सबंधीतीत ग्रामपंचायत प्रशासन तसेच वाळू व्यावसायिकाना सूचना देऊन जड वाहतूक डिग्रस रोड वरील पूर्णपणे वाहतुक बंद केली असुन तहसीलदार दीपक बाजड यांनी नागरिकांचे हित जोपासून तात्काळ उपाययोजना केल्याने दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील नागरिक साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसचे कौतुक करीत आहेत.
      डिग्रस रस्त्यावरील जड वाहतूक पूर्णतहा बंद केली 
    जड वाहतुकीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात रहदारी मागार्ने जाणारी वाहने बंद करण्यात आली असून  तसेच संबंधित ग्राम पंचायत प्रशासन तसेच वाळू व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहे.
                                                    दिपक बाजड - तहसीलदार देऊळगावराजा

         नागरिकांना होणारा त्रास थांबला 
      जड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला होता  तसेच धूळ कणांमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्यामुळे  डीग्रस  रोड वरील जड वाहतूक बंद केल्याने नागरिकाच्या जीवित्वास धोका टळला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
                                                          सुनील मोरे -डिग्रस बु. ग्रामस्थ

No comments:

Post a Comment